महानगरपालिकेने ३ फुटाचे रस्त्याला केले २० फुटांचा..

महानगरपालिकेने ३ फुटाचे रस्त्याला केले २० फुटांचा..

औरंगाबाद : शहरातील टीव्ही सेंटर संजय गांधी भाजी मार्केट येथे मंगळवारी एकूण 20 अतिक्रमण धारकाविरुद्ध कारवाई करण्यात आली.

 उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ याचिका क्रमांक १०९ /२०१५ अंतर्गत आदेशानुसार महानगरपालिका हद्दीमध्ये असलेले हडको आणि सिडको भागातील अतिक्रमणे काढणे बाबत आदेश प्राप्त आहेत.

       टीव्ही सेंटर येथील  संजय गांधी भाजी मार्केट मधील नागरिकांनी प्रवेशद्वारा मध्येच अतिक्रमण केले होते. जवळपास २५  फुटाचा रस्ता प्रस्तावित  असताना   अतिक्रमण धारकांनी ३ फूट रस्ता केला होता. पंधरा दिवसापूर्वी या सर्व अतिक्रमण मधील गाळेधारकांना तोंडी सूचना देऊन सर्व अतिक्रमण काढणे बाबत सूचना दिल्या होत्या. सर्व भाजीपाला कच्चा असतो नुकसान होऊ नये म्हणून सूचना दिल्या होत्या परंतु  एकाही भाजी विक्रेत्यांनी आणि टपरीधारकाने आणि दुकानदारांनी आपले अतिक्रमण काढले नाही.

     म्हणून मंगळवारी सर्वप्रथम जेसीबीच्या साह्याने मुख्य प्रवेशद्वारा लगत असलेले चार लोखंडी टपऱ्या निष्काशीत करून जप्त करण्यात आल्या. त्यानंतर या रस्त्यामध्ये भाजी विक्रेत्यांनी तीन बाय सहा असे दहा ओळी तयार करून रस्ता तीन फुटाचा केला होता ते अतिक्रमण निष्काषित करण्यात आले.

        जय बालाजी भाजी सेंटर, भारत भाजी सेंटर, अथर्व फळे भाज्या विक्री केंद्र यांचे दोन दुकाने निष्काशीत करून रस्ता पूर्ण वीस फुटाचा मोकळा करण्यात आला. या ठिकाणी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या अतिक्रमण धारकांच्या तीन  टपऱ्या आणि शेड काढण्यात आले.

        अतिक्रमण काढताना काही नागरिकांनी प्रथम त्याला थोडा विरोध केला परंतु अतिरिक्त आयुक्त २ तथा अतिक्रमण विभाग प्रमुख  रविंद्र निकम यांनी आणि पद निर्देशित अधिकारी  सविता सोनवणे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार त्यांचे रीतसर अर्ज घेऊन त्यांना कुठे पर्यायी जागा देता येतील का याबाबत प्रशासक यांच्याकडे सविस्तर अहवाल सादर करण्यात येणार आहे.

      याच भाजी मार्केटमध्ये इतर चार दुकानदारांनी दहा बाय दहा या आकाराचे दुकाने  रोडवर बांधलेले आहे. त्यांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या.  त्यामध्ये कच्चा भाजीपाला ठेवलेला असल्याने आज त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. भाजी मार्केट अंतर्गत जे दहा फुटाचे रस्ते आहेत त्यावर  अनेक लोकांनी टपऱ्या टाकून रस्ता लहान केला आहे. यामुळे भाजीपाला खरेदी करणाऱ्या नागरिकांना  पायी चालण्यासाठी त्रास होतो. याबाबत या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी सुद्धा अतिक्रमण काढल्याने आनंद व्यक्त केला. अनेक व्यापाऱ्यांनी असे सांगितले की या मार्केटमध्ये यायला जागा नसल्याने आमचे दुकानदारी बंद पडली आहे. आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. महानगरपालिकेने अतिक्रमण काढले त्याबद्दल  अभिनंदन करण्यात आले. दुकानांचे आणि ओट्यांचे अतिक्रमण काढले म्हणजे पूर्ण २५ फुटाचा रस्ता मोकळा होईल असे यातील व्यापाऱ्यांनी अतिरिक्त आयुक्त  रवींद्र निकम यांच्याकडे मागणी केली आहे.औऔ

      या कारवाईमध्ये प्रशासक   डॉअभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रवींद्र निकम यांचे मार्गदर्शनाखाली पद निर्देशीत  अधिकारी  सविता सोनवणे, वसंत भोये, सिडकोचे उप अभियंता उदय चौधरी, मीनल खिल्लारे ,मनपाचे कनिष्ठ अभियंता पूजा भोगे, इमारत निरीक्षक सय्यद जमशेद ,एम  आर सुरासे, पाटील यांनी कारवाईत सहभाग घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.