गुन्हा दाखल झाल्याझाल्या कुप्रसिद्ध सराईत समाजकंटकाची अटकपूर्व जामीनासाठी धावपळ

गुन्हा दाखल झाल्याझाल्या कुप्रसिद्ध सराईत समाजकंटकाची अटकपूर्व जामीनासाठी धावपळ

      राज्यातील वादग्रस्त वक्तव्य करण्यात कुप्रसिद्ध असलेल्या एका सराईत समाजकंटकाने दोन दिवसांपूर्वी बोलताना महात्मा गांधी यांच्याबद्दल वादगस्त वक्तव्य केलं होतं. या समाजकंटकाचे हे वक्तव्य त्याला चांगलंच भोवण्याची शक्यता आहे. या समाजकंटकाचे विरुद्ध अनेक राजकीय पक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत. या समाजकंटकाचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल होताच आता त्याच्या अटकपूर्व जामिनासाठी हालचालीला सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

      सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या समाजकंटकाच्या गॅंगचे लोकांनी शहरातील प्रसिद्ध वकिलांची भेट घेतली आहे. वकिलांची भेट घेऊन जिल्हा व सत्र न्यायालयात अटपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

       या समाजकंटकाला राज्यातून तडीपार करण्यात यावे किंवा त्याचे डोके ठिकाणावर येईपर्यंत स्थानबद्ध करण्यात यावे अशी मागणी समोर येत आहे.