१२ हजाराची लाच स्वीकारून फौजदार रिक्षातून पळाला
औरंगाबाद, ६ ऑक्टोबर: दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी तक्रारदाराकडे १५ हजारांची मागणी करून तडजोडीअंती १२ हजारांची लाच स्वीकारणारा सहायक फौजदार फारूक गफूर देशमुख (वय ५४ वर्षे) शुक्रवारी एसीबीच्या ट्रेपमध्ये अडकला, मात्र, एसीबीचे पोलिस अधिकारी, कर्मचारी आपल्या दिशेने येत असल्याची चाहूल लागताच देशमुखने मध्यवती बसस्थानक परिसरातून रिक्षात बसून धूम ठोकली.
दुचाकी चोरीच्या गुन्ह्मात आरोपी न करता परस्पर सोडून देण्यासाठी देशमुखने तक्रारदाराकडे गुरुवारी १५ हजार रुपये मागितले, तडजोडीअंती त्याने १२ हजार रुपये घेण्याची तयारी दर्शवली, पण पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबी कार्यालयात धाव घेतली. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने देशमरखशी संपर्क साधला. त्याने तक्रारदाराला मध्यवती बसस्थानकातील पोलिस चौकीकडे येण्यास सांगितले. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार अधिकारी व कर्मचान्यांनी साध्या वेशात सापळा लावला. ठरल्याप्रमाणे देशमुखने १२ हजारांची लाच स्वीकारताच तक्रारदाराने पोलिसांना इशारा केला. पोलिस आपल्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच देशमुख रिक्षात बसून पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला, परंतु गर्दीत रिक्षा निघून गेल्याने तो सापडला नाही. त्याच्यावर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीचे अधीक्षिक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्नाखाली निरीक्षक संतोष घोडके गांच्या पथकाने हा ट्रॅपलावला होता.
लाच स्वीकारल्यानंतर एसीबीच्या पथकाला चकमा देऊन पसार झालेला देशमुख नंतर स्वतःहून क्रांती चौक पोलिस ठाण्यात सायंकाळी हजर झाला. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला.