संभाजी भिडेला औरंगाबादेत पाय ठेवु देणार नाही : महाविकास आघाडी
औरंगाबाद, ३१ जुलै : उदया दिनांक ०१/०८/२०२३ रोजी सिडको अग्रसेन भवन येथे मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेचा कार्यकम ठेवण्यात आला आहे. मनोहर कुलकर्णी यानी अनेक दिवसांपासुन काही अनेक वादग्रस्त वक्तव्य महात्मा ज्योतीबा फुले व साईबाबा यांच्या विषयी सुध्दा केलेले आहे. तसेच देशाचे दैवत राष्टपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल तसेच त्यांच्या आई वडिलांबद्दल अत्यंत अवमानकारक लज्जास्पद वादग्रस्त असे वक्तव्य दोन दिवसांपुर्वी अमरावती येथे एका जाहिर कार्यक्रमात काढले. त्यामुळे भिडेच्या विरोधात संपुर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.
या अगोदर पण त्याने आपल्या देशाचा तिरंगा झेडा नसुन व जन गण मन हे राष्ट्रगीत नसुन देशातील जनतेचे मन दुखाविले व देशाचा अपमान करणारे वक्तत्व केले.
या आधी औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने संभाजी भिडेच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा असे निवेदन दिले होते. व अनेक महापुरुषांबददल अवमानकारक वादग्रस्त वक्तव्य केली असुन त्यापैकी अमरावती शहरात पोलीसांत गुन्हे दाखल झाला आहे. परंतु त्यास अटक न होता तो राज्यात मोकाट फिरत आहे. त्याचा बोलविता धनी कोणीतरी वेगळाच असुन त्यांना राज्यात, देशात जातीय सलोखा, सामाजिक सलोखा संपवुन जाती - धर्मात दंगली घडवुन आणायच्या आहेत. त्याच इरादयाने त्याला राज्यात मोकाट फिरण्याची सरकारने मुभा दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणुन मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे हा दि.०१/०८/२०२३ रोजी औरंगाबाद शहरात येणार असुन त्याचा व त्याचे पाठीराख्यांची औरंगाबाद शहर व जिल्हयातील वातावरण खराब करण्याचा पक्का बेत आहे. .
तो जर औरंगाबाद मध्ये आला तर त्याच्या विरोधात औरंगाबाद शहर व जिल्हा कॉंग्रेस कमिटी तर्फे व अनेक सामाजिक संघटना तर्फे तीव्र प्रतिकार केला जाणार आहे. त्यामुळे आता कुठे पुर्व पदावर आलेले औरंगाबाद शहरातील वातावरण शांतता खराब झाल्या शिवाय राहणार नाही. औरंगााबद जिल्हा व शहर कॉंग्रेस तर्फे दि.२९/०७/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता क्लांतीचौकात तीव्र निदर्शने करâन क्रांतीचौक पोलीस स्टेशन ला त्याचेवर गुन्हा दाखल करुन अटक करणे बाबद तक्रार दिलेली आहे.
अशा आशयाचू निवेदन महाविकास आघाडी तर्फे आज औरंगाबाद शहर पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्याकडे देण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीचे नेते कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.कल्याण काळे, माजी मंत्री अनिल पटेल, माजी महापौर नंदकुमार घोडेले, शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ, सेवादल चे प्रदेश अध्यक्ष विलासबापु औताडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष खाजा शरफोद्दीन, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, भिमशक्तीचे दिनकर वनकर दादा, अनुसुचित जाती विभागाचे डॉ.अरुण शिरसाठ, किरण पाटील डोणगांवकर, डॉ.निलेश अंबेवाडीकर, संतोष भिंगारे, संदीप बोरसे, मोहित जाधव, विजय कांबळे, वरुण पाथ्रीकर,मुददसिर अन्सारी, सचिन पवार, माधवी चंद्रकी, विनायक सरवदे, आसित सरवदे, आकाश रगडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.