मनपा लेबर कंत्राटदारांना पीएफ कार्यालयाची नोटीस जारी; मनपा कर्मचाऱ्यांना मिळणार न्याय

मनपा लेबर कंत्राटदारांना पीएफ कार्यालयाची नोटीस जारी; मनपा कर्मचाऱ्यांना मिळणार न्याय

मनपा लेबर कंत्राटदारांना पीएफ कार्यालयाची नोटीस जारी; मनपा कर्मचाऱ्यांना मिळणार न्याय

खासदार इम्तियाज जलील यांच्या तक्रारीची गंभीर दखल; १० ऑक्टोबर पर्यंत कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश
 
औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांनी दिनांक 27 सप्टेंबर रोजी भविष्य निर्वाह निधी कार्यालयात भेट देवुन महानगरपालिकेत वर्ष 2001 पासून विविध विभागात कार्यरत कर्मचारी यांचे पीएफ आजपर्यंत संबंधित कंत्राटदार व मनपाकडून भरण्यात आले नसल्याचा मुद्दा उपस्थित करुन मनपा कर्मचाऱ्यांना न्याय देणेसंबंधी सविस्तर चर्चा केली होती. खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या मागणीची गंभीरतेने दखल घेत आज कर्मचारी भविष्य निधी संगठन कार्यालयाने वर्तमानपत्रात नोटीस प्रकाशित करुन मनपातील सर्व लेबर कंत्राटदारांना सर्व संबंधित कागदपत्रांसह दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 3.00 वाजता भविष्य निर्वाह निधी संघटना क्षेत्रिय कार्यालयात हजर होण्याचे जाहीर सूचना दिल्या.
         मनपात अनेक वर्षापासुन कार्यरत असलेले कर्मचाऱ्यांचा कामगार कायद्यानुसार कोणत्याही प्रकारचा लाभ न देता त्यांची आर्थिक पिळवणुक केली जात असल्याचे अनेक तक्रारी खासदार इम्तियाज जलील यांना प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने सविस्तर माहिती घेवुन खासदार इम्तियाज जलील यांनी पीएफ आयुक्त जगदीश तांबे यांची भेट घेतली होती; यावेळी विभागीय पीएफ आयुक्त – १ रमेश कुमार, सहाय्यक आयुक्त आर.पी. राजदेरकर व इतर अधिकारी उपस्थित होते.
         कर्मचारी भविष्य निधी संगठन कार्यालयाने वर्तमानपत्रात जाहीर केलेल्या नोटीस मध्ये आजतागायत झालेल्या न्यायालयीन आदेश, चौकशी अहवाल व पत्रव्यवहाराचे उल्लेख केला. पूढे नमूद केले की, माननीय उच्च न्यायालयाने निर्देश लक्षात घेवून औरंगाबाद महापालिकेतील सर्व ठेकेदारांना ही जाहीर नोटीस असे निर्देशानुसार बजावण्यात येते की, त्यांनी तपास कालावधीतील (01/2011 ते 05/2015 माहिती संबंधित कागदपत्रांसह हजर करण्याकरिता 10 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 3.00 वाजता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना क्षेत्रिय कार्यालय, भविष्य निर्वाह निधी कार्यालय, प्लॉट क्रमांक २, टाऊन सेंटर, वाणिज्य क्षेत्र, सिडको, औरंगाबाद या पत्त्यावर अधिनिर्धारित प्राधिकरणासमोर उपस्थित राहावे.