समाजवादी पक्षात महिलांचा मोठा जल्लोष; संभाजीनगरात शेकडो महिलांचा प्रवेश

समाजवादी पक्षात महिलांचा मोठा जल्लोष; संभाजीनगरात शेकडो महिलांचा प्रवेश

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद )|  समाजवादी पार्टी संभाजीनगर (औरंगाबाद ) जिल्हा व महानगर कार्यालयात ८ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या भव्य कार्यक्रमात शेकडो महिलांनी समाजवादी पक्षात जाहीर प्रवेश करून शक्तिप्रदर्शन केलं. जिल्हाध्यक्ष शेख अय्यूब पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा महिला अध्यक्षा शाहीेन पठान यांच्या अध्यक्षतेखाली आणि महानगर महिला अध्यक्षा सीमा मांडविया यांच्या प्रयत्नांतून हा कार्यक्रम दणक्यात पार पडला.

          यामध्ये महानगर महिला सचिव शमशाद शेख यांचे विशेष योगदान राहिले. महिलांच्या या मोठ्या सहभागामुळे पक्षात नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

          पक्षात प्रवेश घेतलेल्या महिलांचे स्वागत करताना समाजवादी पक्षाच्या नेत्या म्हणाल्या —
“महिलांच्या सुरक्षेसाठी, शिक्षणासाठी, सन्मानासाठी आणि अधिकारांसाठी समाजवादी पक्ष सातत्याने लढत आला आहे. पुढेही ही लढाई अधिक ताकदीने सुरू राहील.”

          या प्रवेशामुळे समाजवादी पार्टीची महिला शक्ति संभाजीनगरात आणखी मजबूत झाली असून आगामी काळात महिलांची भूमिका अधिक प्रभावी राहील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.