अल्पसंख्याक विभागातील 609 रिक्त पदे तातडीने भरा – काँग्रेसची मागणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) १० डिसेंबर : नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात अल्पसंख्याक समाजाच्या प्रलंबित योजनांचा तात्काळ निपटारा व्हावा, तसेच नवीन निधी मंजूर करावा या मागण्यांसाठी आज अल्पसंख्यांक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचा मार्च अखेरचा कर्जवाटपाचा निधी शासनाने त्वरित वितरित करावा. याशिवाय या अधिवेशनात महामंडळासाठी नवीन 1000 कोटी रुपयांचा बजेट मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली.
तसेच इतर महामंडळांप्रमाणे कर्जावरील व्याज शासन भरते, त्याप्रमाणे मौलाना आझाद महामंडळातील कर्जदारांचे व्याजही शासनाने भरावे, अशी मागणी करण्यात आली. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीची मार्टी योजना त्वरित सुरू करावी, तसेच अल्पसंख्याक विभागातील एकूण 609 रिक्त पदे तातडीने भरावीत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
या वेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष इब्राहिम पठाण, महासचिव इंजि. इफ्तेखार शेख, जिल्हाध्यक्ष अनिस पटेल, शहर जिल्हाध्यक्ष मोईन इनामदार, ज्येष्ठ नेते आकेफ रजवी, प्रदेश सचिव साजिद कुरेशी, युवक काँग्रेसचे महासचिव आमेर अब्दुल सलीम, इकबालसिंग गिल, डॉ. अरुण शिरसाठ, डॉ. साहिल हाश्मी, प्रवीणबाजी देशमुख, मजाज अहमद खान, जसबीरसिंग सौदी, नंदकुमार जैन, अब्दुल राजीक, महेश वैद्य, शहाजेब आसिफ खान, जाफर खान, रफिक शेख, आनंद दाभाडे, सत्तार शेख आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते
या कार्यक्रमाचे आयोजन अल्पसंख्याक जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अनिस पटेल आणि शहर जिल्हाध्यक्ष मोईन इनामदार यांनी केले.