भाजपाला मुसलमानांच्या एका मताचीही गरज नाही : भाजपाचा ज्येष्ठ नेता
बेंगलोर : कर्नाटक राज्यातील भारतीय जनता पार्टीचे (BJP) ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री केईएस ईश्वरप्पा यांनी एक वक्तव्य केले आहे की, आम्हाला मुस्लिमांच्या एका मताचीही गरज नाही.
वीरशैव-लिंगायत धार्मिक विभाजनाच्या मुद्द्यावर झालेल्या बैठकीत ईश्वरप्पा यांनी हे वक्तव्य केले आहे. याप्रसंगी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा पण उपस्थित होते.
कर्नाटक राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आज हुबळी आणि पश्चिम धारवाड मतदारसंघात प्रचार दौऱ्यावर आहेत.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस होता. निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 517 उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यात आलेली आहे. आता संपूर्ण कर्नाटका एकूण 2,613 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.