बहुआयामी फुटबॉल प्रशिक्षक, संघटक हकीम साहेब....!!

बहुआयामी फुटबॉल प्रशिक्षक, संघटक हकीम साहेब....!!

एक नामांकित व उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू, प्रशिक्षक, पंच, प्रशासक व समालोचक अशा बहुयामी व्यक्ती महणून ओळख निर्माण करणारे व तब्बल पाच दशके भारतीय फुटबॉलशी आपली नाळ  जोडून ठेवलेल्या स्क्वाड्रन लिडर  शाहिद हकीम देशभरातच नव्हे तर अख्ख्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल जगतात 'हकीम साहेब' अशा आदराने मिळवलेला मान, अशा हकीम साहेबांचे नुकतेच निधन झाले. त्यानिमीत्ताने त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख एका अर्थाने या महान फुटबॉलपटू च्या कर्तृत्वाला विनम्र अभिवादन.


 
हकीम साहेबांचा जन्म 23 जून 1939 साली हैदराबाद येथे झाला. शालेय जिवनापासून त्यांना खेळाची विशेषकरून फुटबॉल ची आवड होती. त्यांचे वडील सय्यद अब्दुल रहिम हे सवतः उत्कृष्ट फुटबॉलपटू व उत्तम प्रशिक्षक होते. त्यांनी आपल्या मुलाच्या अंगातील गुण ओळखून त्यांना आपल्याच तालमीत तयार केले. हकीम सहाब यांनी शालेय व आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत आपली ओळख निर्माण करून राष्ट्रीय निवड कर्त्यांना आपल्या कडे आकर्षित केले. आणि राष्ट्रीय संघात स्थान मिळवले. आणि मधल्या फळीतील एक उत्तम खेळाडू म्हणून छाप टाकली. आणि बघता, बघता हा हैदराबादी खेळाडू रोम येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघात सामिल झाला. 

दिल्ली येथे 1982 साली  संपन्न झालेल्या आशियाई स्पर्धे च्या वेळी तत्कालीन भारतीय संघाचे प्रशिक्षक पी के बॅनर्जी यांचे सहाय्यक महणून काम पाहिले. 

मरडेका चषकच्या वेळी हकीम सहाब भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक बनले. देशांतर्गत 1988 खेळण्यात आलेल्या स्पर्धेत त्यानी महिंद्र, एनड महिंद्रा संघाला प्रशिक्षण दिली, त्या संघाने बलाढ्य समजल्या जाणारया ईस्ट बंगाल संघावर विजय मिळवत डयूरंड चषक आपल्या नांवे करून हकीम सहाब याच्या परशिक्षणाची जणू पावतीच दिली. 

हकीम सहाब यांनी साळगावकर संघाला ही प्रशिक्षण दिले. तसेच बंगाल व मुंबई फुटबॉल क्लबला ही 2004 ते 2006 या कालावधीत  मार्गदर्शनकेले. 

हकीम साहाब यांचा या कार्यांचा आलेख दिवसा गणीक चढतच गेला. आंतरराषटीय फुटबॉल स्पर्धेत फिफा ( फेडरेशन ऑइंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन) यांत आपले नामांकन पंच महणून मिळवले .1989 पर्यतं त्यांनी तब्बल 33 सामन्यांत पंच महणून उत्तम कामगिरी बजावली. 

कतर येथे संपन्न झालेल्या आशियन फुटबॉल चषक स्पर्धेतही हकीम सहाब यांनी पंच म्हणून कामगिरी बजावली. 1981 पर्यंत ते भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. 

17 वर्षाखालील फिफा जागतीक चषकच्या वेळी हकीम सहाब यांना भारतभर चाचणी घेवून खेळाडू निवडुन ते सरावासाठी पाठवण्याची महत्वपूर्ण कामगीरी सोपवण्यात आली होती. सदर स्पर्धेसाठी त्याना संयोजन संचालक महणून जबाबदारी देण्यात आली होती. 

हकीम सहाब भारतीय वायू सेनेत स्क्वाड्रन लिडर या महत्वाच्या पदावरून निवृत्त झाले होते. 
त्यांच्या कार्याची पावती महणून त्यांना साई अर्थात भारतीय क्रिडा प्राधिकरण येथे संचालक महणून नियुक्त करण्यात आले. औरंगाबादेत आज जे 'साई' चे केन्द्र दिसत आहे ते हकीम सहाब मुळेच. त्यांनी हे सेंटर उभे करण्यासाठी भरपूर मेहनत घेतली. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हे सेंटर औरंगाबाद येथे टिकले, नसता केव्हांच ते गांधीनगर येथे गेले असते.

औरंगाबाद येथे आल्यावर त्यांनी साई बरोबरच येथील फुटबॉलवर आपले लक्ष्य केंद्रीत केले. साई फुटबॉल क्लब ची सथापणा देखील त्यांनीच केली. शहरातील होतकरू खेळाडू ओळखून त्याना घडवले. त्या पैकी एजाज़ खान, वकील खान, शेख बाबर, यांची  संतोष चषकासाठी महाराष्ट्रातील संघात निवड झाली. पुढे याच खेळाडूंना हकीम सहाब यांच्या प्रयत्नांना यश येवून तत्कालीन सहाय्यक पोलिस अधीक्षक व सध्याचे सीबीआय प्रमुख सुबोध कुमार जयस्वाल यांनी पोलिस दलात समावून घेतले. हे खेळाडू महाराष्ट्र पोलिस दलाकडून ही खेळले. तसेच मुहम्मद खिजर हा खेळाडू ही त्यांच्याच तालमीत तयार होवून महाराष्ट्र संघाकडून संतोष चषकासाठी खेळला. 

हकीम सहाब यांच्याच काळात औरंगाबाद येथे अखिल भारतीय आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी डाॅ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघास त्यांनीच परशिक्षण देवून अवघ्या पंधरा दिवसांत हा संघ तयार केला. या संघाने सदर स्पर्धेत अंतिम फेरी गाठून उप विजेतेपद पटकावले होते...हे विशेष. 

औरंगाबादचया एकंदरीत खेळांचे वातावरण, विशेष करून फुटबॉल  चे आकर्षणामुळे हकीम सहाब यांनी औरंगाबादेत राहण्याचा निर्णय घेतला. येथील खेळाडूना वेळो वेळी योग्य मार्गदर्शन ते करत होते.

औरंगाबाद जिल्हा साखळी सामन्यांत ही त्यानी पंच महणून उत्तम कामगिरी बजावली. फिफा रेफरी महणून नावलौकिक मिळवून देखील एक फुटबॉलपटू महणून स्थानिक सामन्यांत पंच महणून कामगिरी करणयास त्यांना कधी संकोच वाटला नाही. काही सामन्यांत त्यांच्या सोबत असीस्टंट पंच महणून मलाही सामने खेळविण्याची संधी मिळाली हे मी माझें भाग्य समजतो. 

हकीम सहाब याच्या कल्पने मुळे औरंगाबादेत मिलिंद महाविद्यालयाच्या मैदानात सर्वप्रथम गोल्ड कप ही सर्वात मोठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेस मिलिंद महाविद्यालयाच्या क्रिडा विभागाचे तत्कालीन प्रमुख भारसाकळे सर व विद्यापिठाच्या क्रीडा विभागाचे तत्कालीन प्रमुख डाॅ दत्ता पाथरीकर सरांनी मोलाचे सहकार्य केले होते. या स्पर्धेस देश भारतातील प्रमुख संघांनी ज्यात बंगाल एकादश, गोव्याचा चर्चील ब्रदर्स, दिल्ली एकादश, हैदराबाद, महाराष्ट्र, गुजरात, ओरिसा, येथील संघांनी हजेरी लावली होती. 

तसेच एम जी एम च्या हिरवळीवर अखिल भारतीय महापौर चषक स्पर्धा ही हकीम सहाब यांच्याच प्रयत्नांमुळेच यशस्वी झाल्या. तसेच औरंगाबादचया फुटबॉलपटू साठी त्यानी महिना भर प्रशिक्षण देवून  डाॅ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात  पंच परीक्षा आयोजित करून तब्बल एक डझनभर पंच तयार केले होते. 

हकीम सहाब हे दिल्ली येथील जामीया मिल्लीया विद्यापीठ येथे काही काळ कीरडा विभाग प्रमुख होते. 

त्याच्या आजवरच्या कारकिर्दीतील कामगिरी पाहून भारत सरकारने 2017 सालचा द्रोनाचार्य ह्या ध्यान चंद पुरस्काराने  राष्ट्रपती रामनाथ कोविद यांच्या हसते सम्मानित केले होते. हा पुरस्कार मिळवणारे ते दुसरे फुटबॉलपटू ठरले. त्यापूर्वी बंगाल चे फुटबॉलपटू शब्बीर अली यांना हा पुरस्कार मिळाला होता.  

हकीम सहाब यांचे वडील व भारतीय संघाचे प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहिम यांच्यावर एक सिनेमा निर्मीती चे काम सध्या सुरू होते. या सिनेमात सय्यद अब्दुल रहिम यांची भूमिका अभिनेता  अजय देवगण साकारणार होता. त्यासाठी हकीम सहाब कर्नाटक राज्यातील गुलबर्गा या शहराकडे हैदराबादहून रेल्वेने प्रवास करत असताना त्यांना ह्रदय विकाराचा तिव्र झटका आल्यानंतर त्यांना गुलबर्गा येथील शासकीय रूग्णालयात भरती करण्यात आले होते. तेथे त्यानी 22 ऑगस्ट  2021 रोजी अंतिम श्वास घेतला, अशी माहिती त्याच्या पत्नी सफीया हकीम यांनी दिली. मृत्यू समयी त्याचे वय 82 होते. 

हकीम सहाब हे एक उत्कृष्ट फुटबॉलपटू सोबतच, फिफा रेफरी, प्रशिक्षक, प्रशासक व जागतिक फुटबॉल स्पर्धेच्यावेळी दूरदर्शन साठी समालोचक, मितभाषी होते. त्यांची ही ओळख केवळ भारतातच नव्हे तर आतरराषटीय फुटबॉल जगतात होती. सर्वजण त्यांना आदराने 'हकीम सहाब ' महणून हाक मारत होते. 

अशा या महान फुटबॉलपटू ज्याने वेगवेगळ्या भूमिकेतून भारतीय फुटबॉलसाठी तब्बल पाच दशके खर्ची केले, त्यांच्या जाण्याने भारतीय फुटबॉल ची कधी न भरून निघणारी हाणी झाली. अशा महान फुटबॉलपटू हकीम सहाब यांना विनम्र अभिवादन

 डॉ. अब्दुल क़दीर, वरिष्ठ पत्रकार, फुटबॉलपटू, औरंगाबाद.

E mail abdulqadeer7860@gmail.com