वोट मागायला "भाऊ", विरोध केला तर "आतंकवादी" – तेजस्वींचा राजकारण!

वोट मागायला "भाऊ", विरोध केला तर "आतंकवादी" – तेजस्वींचा राजकारण!

         बिहार विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत तेजस्वी यादव हे नाव सर्वत्र चर्चेत आहे. एकीकडे ते मुस्लिमांना डेप्युटी सीएम बनवण्याची, वक्फ कायदा कचऱ्यात टाकण्याची आणि प्रत्येक मुसलमानाला ५-६ हिंदू भाऊ संरक्षण देतील अशी गोड गोड स्वप्ने दाखवतात. दुसरीकडे असदुद्दीन ओवैसी यांना चरमपंथी, आतंकवादीसारखे आणि टोपी-दाढीमुळे असे वाटते असे म्हणून त्यांनी आपला खरा चेहरा उघड केला. हा लेख या दोन्ही बाजूंचा विचार करून तेजस्वींच्या राजकीय खेळाचा खरपूस समाचार घेतो.

        तेजस्वी म्हणतात मुस्लिम आमचे साझेदार आहेत वोट बँक नाहीत. पण जेव्हा एआयएमआयएमने ६ जागा मागितल्या तेव्हा त्यांनी चरमपंथींना जागा नाही म्हणून नाकारले. मग प्रश्न आहे साझेदार कोण जे तुमच्या हातातून खातात चरमपंथी कोण जे तुमच्या विरोधात उभे राहतात. तेजस्वींची ही साझेदारी फक्त वोट मिळवण्यापुरती आहे. ओवैसींनी मुस्लिमांच्या हक्कांसाठी आवाज उठवला म्हणून त्यांना आतंकवादी ठरवले. हा राजकीय दुटप्पीपणा नाही तर काय.

      तेजस्वींनी सबा नकवीच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले ओवैसींच्या डोक्यावर टोपी चेहऱ्यावर दाढी यामुळे ते आतंकवादी वाटतात. हे वाक्य फक्त ओवैसींवर नाही तर प्रत्येक मुसलमानावर हल्ला आहे. टोपी-दाढी ही धार्मिक ओळख आहे. तेजस्वींनी ती आतंकवादाशी जोडली. हा हेट स्पीच नाही तर काय. जर एखादा हिंदू नेता जनेू-टिकली पाहून कोणाला हिंदुत्ववादी म्हणाला तर तेजस्वी काय म्हणाले असते. पण मुसलमानांवर हल्ला करणे सोपे आहे कारण ते वोट बँक आहेत ना.

        वक्फ कायदा कचऱ्यात टाकण्याची घोषणा पण आतापर्यंत आरजेडीने काय केले. मुस्लिम डेप्युटी सीएम मागील सरकारमध्ये एकही मुसलमान मंत्री नव्हता. ५-६ हिंदू मुसलमानांचे रक्षण करतील मग अररियातील बीजेपी आमदाराच्या धमकीवर का मौन. हे सर्व जुमले निवडणुकीपुरते आहेत. वोट मिळाला की मुसलमान पुन्हा वोट बँक बनतील.

        ओवैसींनी किशनगंजच्या सभेत म्हटले जर रसूल स. चे अनुयायी असणे चरमपंथ आहे तर मला त्याचा अभिमान आहे. हा तेजस्वींच्या दुटप्पीपणाचा खरा आयना आहे. ओवैसी मुसलमानांचे हक्क मागतात. तेजस्वी फक्त वोट मागतात.

         तेजस्वी यादव नव्या बिहारचे स्वप्न दाखवतात पण त्यांचे शब्द जुने राजकारणी दाखवतात. मुस्लिमांना डेप्युटी सीएम देण्याची बात फसवी आश्वासने. ओवैसींना रिकॉर्डिंग ओवैसींना आतंकवादी म्हणणे धार्मिक अपमान आणि हेट स्पीच. वक्फ कायद्याची घोषणा निवडणुकीचा जुमला. तेजस्वींचा खरा चेहरा हा आहे वोट मिळवण्यासाठी काहीही बोलणारा पण सत्तेत आल्यावर मौन धारण करणारा नेता. बिहारच्या जनतेला हा खेळ समजला पाहिजे. वोट हा अधिकार आहे विश्वासघात नाही.

- डॉ. रियाज़ देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त (सेनि), छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)