शहरवासीयांनो पोलीसांचे हे कायमस्वरूपी मोबाईल नंबर सेव्ह करून ठेवा : अडचणीच्या वेळी कामी पडतील...

शहरवासीयांनो पोलीसांचे हे कायमस्वरूपी मोबाईल नंबर सेव्ह करून ठेवा : अडचणीच्या वेळी कामी पडतील...

औरंगाबाद : औरंगाबाद शहरवासियांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शहरातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे आणि सर्व पोलीस स्टेशनचे इन्चार्ज (ठाणेदार) यांचे कायमस्वरूपी मोबाईल नंबर शहरात रुजू झालेले नवीन पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी शनिवारी जाहीर केले आहे.

     पोलीस आयुक्तांनी जाहीर केलेले हे मोबाईल नंबर औरंगाबाद शहरवासीयांनी कायमस्वरूपी आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवल्यास अडचणीच्या वेळी या मोबाईल नंबर वर कॉल करून सत्वर पोलीस मदत मिळविता येईल. 1 जून 2023 पासून हे सर्व मोबाईल नंबर कार्यान्वित होणार आहेत.

   सामान्य नागरिकांना सहज पोलीसांशी थेट संपर्क साधता यावा म्हणून भारतातील अनेक राज्यात अशा पद्धतीचे वन युनिट, वन ऑफिसर, वन मोबाईल योजना राबविण्यात येत आहे. हीच पद्धत One Unit, One Officer, One Mobile ही योजना औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयात राबविण्याचा निर्णय औरंगाबाद शहर पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी घेतला आहे.

      ही योजना राबविण्यासाठी शहरातील सर्व पोलीस स्टेशन ऑफिसर (ठाणेदार) सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस उपायुक्त, तसेच पोलीस आयुक्तालयातील सर्व शाखाप्रमुखांना सरकार मार्फत, सरकारी खर्चावर हे मोबाईल नंबर चे सिम कार्ड पोलीस आयुक्त कार्यालयाकडून वितरित करण्यात येणार आहेत. स्वतः पोलीस आयुक्तांकडे सुद्धा असाच एक नंबर असणार आहे.

     विशेष म्हणजे हे अधिकारी त्यांचे पदावरून बदलून गेले तरी त्यांचे जागी येणाऱ्या अधिकाऱ्याकडे तोच मोबाईल नंबर राहणार आहे. म्हणून एकदा नागरिकांनी आपल्याकडे तो नंबर सेव्ह करून ठेवला तर भविष्यात कायमस्वरूपी त्याचा उपयोग करता येणार आहे.

      वन युनिट, वन ऑफिसर, वन मोबाईल नंबर योजनेमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस अधिकाऱ्यांशी तात्काळ कॉन्टॅक्ट करणे किंवा कोणत्याही घटनेची माहिती देण्यासाठी नागरिकांना, पोलीस मित्रांना, गुप्त बातमीदारांना त्या-त्या पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधने सोयीचे होणार आहे.

       औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयात राबविण्यात येणाऱ्या या योजनेशिवाय पोलीस नियंत्रण कक्षाचा डायल 112 आणि लँडलाईन नंबर 2240500 तसेच पोलीस ठाण्याचे आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे लँडलाईन नंबर्स पण सुरू राहणार आहेत.

औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मोबाईल फोन नंबर्स :

पोलीस आयुक्त : 9226514001
पोलीस उपायुक्त (मुख्यालय) : 9226514002
पोलीस उपायुक्त (परिमंडळ-१) : 9226514003
पोलीस उपायुक्त (परिमंडळ-२) : 9226514004
सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा : 9226514005
सहाय्यक पोलीस आयुक्त, प्रशासन : 9226514006
सहाय्यक पोलीस आयुक्त, विशेष शाखा : 9226514007
सहाय्यक पोलीस आयुक्त, शहर विभाग: 9226514008
सहाय्यक पोलीस आयुक्त, छावणी विभाग: 9226514009
सहाय्यक पोलीस आयुक्त, सिडको विभाग: 9226514010
सहाय्यक पोलीस आयुक्त, उस्मानपुरा विभाग: 9226514011
सहाय्यक पोलीस आयुक्त ,वाहतूक शाखा: 9226514012
पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष: 9226514013
पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा: 9226514014
पोलीस निरीक्षक विशेष शाखा: 9226514015
पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा: 9226514016
पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे सायबर: 9226514017
पोलीस निरीक्षक सुरक्षा विभाग: 9226514018
पोलीस निरीक्षक बॉम्बशोधक व नाशक पथक: 9226514019
पोलीस निरीक्षक पोलीस कल्याण: 9226514020
पोलीस निरीक्षक हायकोर्ट सुरक्षा: 9226514021
पोलीस निरीक्षक वाचक शाखा: 9226514022
पोलीस निरीक्षक भरोसा सेल (महिला सहाय्यता): 9226514023
पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे सिटी चौक: 9226514024
पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे क्रांती चौक: 9226514025
पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे छावणी: 9226514026
पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे वाळूज: 9226514027
पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे एम वाळूज: 9226514028
पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे बेगमपुरा: 9226514029
पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे दौलताबाद: 9226514030
पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे वेदांत नगर: 9226514031
पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे सिडको: 9226514032
पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे जीन्सी: 9226514033
पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे जवाहर नगर: 9226514034
पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे एम सिडको: 9226514035
पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे मुकुंदवाडी: 9226514036
पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे उस्मानपुरा: 9226514037
पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे सातारा: 9226514038
पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे हर्सुल: 9226514039
पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे पुंडलिक नगर: 9226514040
पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा शहर विभाग-१: 9226514041
पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा शहर विभाग-२: 9226514042
पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा सिडको विभाग: 9226514043
पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा छावणी विभाग: 9226514044
पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा वाळूज विभाग: 9226514045
पोलीस निरीक्षक दंगा काबू पथक:  9226514046
कोर्ट मॉनिटरिंग सेल (पैरवी अधिकारी):  9226514047
पोलीस निरीक्षक मनपा अतिक्रमण हटाव पथक: 9226514048
पोलीस निरीक्षक मोटार परिवहन विभाग: 9226514049
पोलीस निरीक्षक बिनतारी संदेश विभाग: 9226514050