महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे कर्तुत्ववान सीईओ ताशीलदार यांचा सत्कार...
औरंगाबाद (प्रतिनिधी) : मागील नऊ दहा वर्षापासून महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचा कार्यभार उपसचिव किंवा त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविला जात आहे. अतिरिक्त कारभार असल्यामुळे ज्या अधिकाऱ्याकडे हा कारभार सोपविलेला जायचा तो अधिकारी दोन तीन महिन्यांनी किंवा सहा महिन्यांनी एकदा औरंगाबाद येथील महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे कार्यालयात येऊन काम करीत असे. त्यामुळे नऊ दहा वर्षापासून महाराष्ट्रातील वक्फ संस्थांची कामे, बोर्डाची कामे कासव गतीने चालत होती.
नुकताच महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाचा अतिरिक्त कारभार महाराष्ट्र शासनाचे अल्पसंख्यांक विकास विभागाचे उपसचिव मो.बा. ताशीलदार यांचे कडे सोपविण्यात आलेला आहे. जेव्हापासून त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाचा कारभार स्वीकारला तेव्हापासून त्यांनी अनेक वर्षापासून प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचा सपाटाच लावलेला आहे. एक उत्तम प्रशासक कसा असावा त्याचा प्रत्यय त्यांनी या अल्प कालावधीत दाखवून दिला आहे. हाताखालील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कशी कामे करून घ्यायची? जबाबदाऱ्या कशा फिक्स करायच्या? त्यांना कामे करण्यासाठी कसे प्रवृत्त करायचे? साचेबद्ध पद्धतीने वेळेच्या आत कामे कशी पूर्ण करायची? वक्फ संस्थांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी तात्काळ निर्णय कसे घ्यावे? एका प्रशासकाची निर्णय क्षमता किती महत्त्वाची असते? अतिरिक्त कारभार जरी असला तरी त्याची जबाबदारी इमानदारीने कशी पेलावी? हे त्यांनी आपल्या कर्तुत्वाने दाखवून दिले आहे.
त्यांचे कर्तृत्वाची दखल घेत महाराष्ट्र वक्फ मूव्हमेंटचे पदाधिकाऱ्यांनी आज मो. बा. ताशीलदार यांचा महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे कार्यालयात जाऊन सत्कार केला. याप्रसंगी मोहम्मद अझहर खान, प्रांतोष वाघमारे, इलियास खान, नजीर खान, शुभम, किशोर खेडकर, माजेद खान, अदनान खान इत्यादींची उपस्थिती होती.