जिल्ह्यात महायुतीला 4, काँग्रेसला 2, ठाकरे गटाला एक नगराध्यक्ष पद

जिल्ह्यात महायुतीला 4, काँग्रेसला 2, ठाकरे गटाला एक नगराध्यक्ष पद

फुलंब्री नगरपंचायतीच्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या महाविकास आघाडीचे राजेंद्र ठोंबरे विजयी झाले. सिल्लोड येथे शिंदे सेनेचे अब्दुल समीर अब्दुल सत्तार नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. खुलताबाद नगरपरिषदेत काँग्रेसचे आमेर पटेल, तर कन्नड येथे काँग्रेसच्या फरहिन जावेद शेख यांनी विजय मिळवला आहे.

वैजापूर नगरपरिषदेत भाजपाचे दिनेश परदेशी, पैठण येथे विद्या कावसानकर तर गंगापूर येथे अजित पवार गटाचे संजय जाधव नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत.

या सर्व ठिकाणी विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलाल उधळून आणि घोषणा देत आनंद साजरा केला. कार्यकर्त्यांनी एकमेकांचे अभिनंदन करत विजयाचा उत्सव साजरा केला.