जोगेश्वरीच्या विवाहितेला एका श्रीमंत म्हताऱ्यासोबत बळजबरीने लग्न लावण्यासाठी दोन दिवस डांबून ठेवले :  पुढे असे घडले...

जोगेश्वरीच्या विवाहितेला एका श्रीमंत म्हताऱ्यासोबत बळजबरीने लग्न लावण्यासाठी दोन दिवस डांबून ठेवले :  पुढे असे घडले...

औरंगाबाद : एमआयडीसी वाळूज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जोगेश्वरी येथे राहणाऱ्या एका विवाहितेचे आपल्या पतीसोबत किरकोळ वाद झाल्याने ती गल्लीतील एका ओळखीच्या महिलेकडे गेली आणि आपले गऱ्हाणे मांडले. त्या महिलेने तिला चितेगाव येथे नेले. नंतर तिथे त्या महिलेची आई व तिचा मित्र पोहोचले. तिघांनी प्लॅन बनवला की या विवाहितेचे एका श्रमंत माणसासोबत लग्न लाऊन द्यायचे. यासाठी त्या विवाहितेला मारहाण केली. दोन दिवस डांबून ठेवले. मात्र, सदर विवाहितेने समय सुचकता दाखवून पतीला कॉल केला आणि नंतर फिल्मीस्टाईल तिची सुटका झाली. याप्रकरणी तिघांवर पोलीस स्टेशन एमआयडीसी वाळूज येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       यासंबंधी सविस्तर माहिती अशी आहे की, औरंगाबाद शहरातील पोलीस स्टेशन एमआयडीसी सिडको अंतर्गत जोगेश्वरी येथील 25 वर्षीय मनीषा (नाव बदलले आहे) या विवाहितेने दिनांक 28 मे 2023 रोजी पोलीस स्टेशन एमआयडीसी सिडको येथे हजर येऊन एफ आय आर दिली. आपल्या तक्रारीत तिने पोलिसांना सांगितले की, ती राहत असलेल्या गल्लीतील एका ओळखीच्या बाईकडे तिचे घरी येणे जाणे आहे. दिनांक 22/05/2023 रोजी दुपारी 3.00 वाजेच्या सुमारास तिचे पती सोबत घरगुती कारणावरुन किरकोळ वाद झाला होता. म्हणून ती मनीषा शेजारी गल्लीत राहणारी त्या ओळखीच्या बाईचे घरी गेली   अन आपले गऱ्हाणे मांडले. मनीषा त्या बाईच्या घरी रात्रभर राहिली. दिनांक 23/05/2023 रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास ती बाई मनीषाला म्हणाली की, तुझा पती तुला आता घरात घेणार नाही. आपण घरी राहिल्यावर बोर होऊ, मी तुला माझ्या मैत्रीणीकडे चितेगावला घेवून जाते. त्यानंतर त्या बाईने मनीषाला रिक्षाने चितेगावला घेवून गेली.

       चितेगांवला 11.00 वाजे दरम्यान पोहचल्या. चितेगावला एका घराजवळ गेल्यावर त्या बाईने कुलुप उघडले व दोघी घरात गेल्या. पाठीमागुन 15 ते 20 मिनिटाने त्या बाईची आई व तिचा मित्र शाहरुख सय्यद तेथे आले. त्यामुळे मनीषाला संशय आला आणि तिने सायंकाळी 4.00 वाजेच्या सुमारास जोगेश्वरी येथे घरी नेऊन सोडणेबाबत विनंती केली. परंतु ते लोक मनीषाचे काहीएक ऐकत नव्हते ते म्हणायचे की, तुला आता येथेच राहायचे आहे. यास मनीषाने नकार दिल्यावर तिला मारण्याच्या धमक्या त्यांनी दिल्या.

      रात्रीच्या सुमारास मनीषाने जोगेश्वरीतील घरी सोडण्याची त्यांना विनंती केली असता ते म्हणाले की, तुला आता आम्ही घरी जाऊ देणार नाही. तुझे आम्ही एका श्रीमंत व्यक्तीसोबत लग्न लावून देणार आहो. तो तुला सुखात ठेवेल असे म्हणत होते. मनीषाने त्यास विरोध केला मात्र ते तिला धमकावत होते. त्यांनी विवाहितेला घराबाहेर जाऊ दिले नाही. घरातच दोन दिवस डांबून ठेवले. नंतर मनीषाला कोणतीही माहिती न देता एका रिक्षाने बीड बायपास रोडच्या बाजुला थोड्या अंतरावर असलेल्या दोन मजली बिल्डींग मधील एका घरात घेवून गेले.  तिथं एक म्हातारा माणूस होता. तुला या माणसासोबत लग्न करायचे आहे, असे तिघांनी त्या मनीषाला सुनावले. माझे लग्न झाले असून मला लग्न करायचे नाही, असे मनीषाने म्हणताच तिघे म्हणाले की, तुला लग्न करावेच लागेल तुला या शिवाय पर्याय नाही. मनीषा लग्न करण्यास तयार नसल्याचे व ती विवाहित असल्याचे समजल्यावर त्या म्हाताऱ्या माणसाने त्या तिघांना सांगितले की ही पोरगी लग्न करायचे नाही म्हणते, एखादी दुसरी मुलगी आणा. तरीपण ते तिघे मनीषाला दमदाटी करुन लग्न करण्याचा आग्रह करित होते. मनीषा लग्नास नकार देत होती.

     त्यानंतर त्या तिघांनी मनीषाला परत रिक्षात बसवून चितेगाव येथे त्याच घरात घेवून गेले. चितेगावला नेल्यावर त्या तिघांनी घरात हाताचापटाने मारहाण केली. एक रात्रभर तिथेच ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते तिघे जण घराच्या बाजुला गेल्याची संधी साधत मनीषा त्यांची नजर चुकवून घराच्या बाहेर आली. आणि एक  रिक्षाने घरी येत असताना त्या तिघांनी मनीषाला कांचनवाडी येथे पकडले. मनीषाला रिक्षात बसवून बळजबरीने घाणेगाव येथे घेवून गेले.

      घाणेगाव येथे स्मशान भूमीजवळ नेले तेथे ते तिघे रिक्षातून उतरले. त्यावेळी मनीषा सुध्दा रिक्षातून उतरून रोडने जाणाऱ्या एका माणसाकडे पळत जावून त्यांच्या मोबाईलवरून पतीच्या मोबाईलवर कॉल केला. पतीने तातडीने घटनास्थळ गाठून तिघांच्या तावडीतून तिची सुटका केली.

      तीन दिवसानंतर याप्रकरणी दिनांक 28 मे 2023 रोजी रात्री मनीषाने एमआईडीसी वाळूज पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. त्यावरून त्या दोन्ही महिला आणि शाहरुख सय्यद यांचे विरुद्ध भारतीय दंडविधानाचे कलम 366, 343, 323, 504, 506, 34 नुसार  अपराध क्रमांक 433/20230 दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक ताठे करीत आहेत.