शहरात कायद्याचा बुलडोझर धडधडला – महापालिकेची ऐतिहासिक पाडापाडी

छत्रपती संभाजीनगर, २८ जून :शहरातील जालना रोडवरील केंब्रिज चौक ते चिकलठाणा दरम्यान महापालिकेने आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठी अतिक्रमणविरोधी कारवाई केली. या मोहिमेमध्ये तब्बल ४९० अतिक्रमणांचे पक्के आणि कच्चे बांधकामे — हॉटेल्स, लॉज, दुकाने, शेड, गॅरेज, जाहिरात फलक, ओटे, कंपाउंड व कमानी — जमीनदोस्त करण्यात आले.
ही भव्य कारवाई मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे, नगररचना उपसंचालक श्री. गरजे, यांत्रिकी विभाग प्रमुख अमोल कुलकर्णी, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, तसेच सहाय्यक आयुक्त रणजीत पाटील यांची यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका होती.
३५० महापालिका कर्मचारी व अधिकार
४०० पोलिसांचा बंदोबस्त
२० जेसीबी, ५ पोकलॅन, १५ टिप्पर, २ रूग्णवाहिका, २ अग्निशमन बंब
हायड्रॉलिक वीज यंत्रे आणि अतिक्रमण हटवण्यासाठी खास वाहनं
या यंत्रसामग्रीच्या मदतीने कारवाई मोठ्या प्रमाणावर आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.
या मोहिमेत उपायुक्त सविता सोनवणे, सहाय्यक आयुक्त अर्जून गिराम, प्राजक्ता वंजारी, अर्चना राजपूत, रमेश मोरे, गिरी, राहूल जाधव, नईम अन्सारी, इमारत निरीक्षक कुणाल भोसले आणि तृप्ती जाधव यांचा विशेष सहभाग होता.
या कारवाईला विरोध करणाऱ्या ४ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच अंदाजे ६ कोटी रुपये किमतीच्या अतिक्रमित मालमत्तांवर गुंठेवारी कायद्यानुसार नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
ही कारवाई छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासात 'बुलडोझर मोहिम' म्हणून नोंदवली जाणार आहे. प्रशासनाकडून ही केवळ सुरुवात असल्याचे संकेत मिळत असून, येणाऱ्या काळात शहरातील इतर अतिक्रमणांवरही अशीच धडक कारवाई होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
"आजची कारवाई म्हणजे कायद्याचं वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित करणारं पाऊल आहे."
या कारवाईमुळे अतिक्रमणकर्त्यांना स्पष्ट संदेश मिळाला आहे की, कायद्याच्या बाहेर कुणीही राहू शकत नाही आणि प्रशासन आता अधिक सक्तीने शहर स्वच्छ आणि शिस्तबद्ध करण्यासाठी पुढे येत आहे.