वाळुज महानगर सिडको ऑफिसला खेटून ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर तुंबले : प्रशासन मात्र झोपेत

वाळूज महानगर, १९ जून : आज सिडको वाळूजमहानगर-१ तिरूमला जवळपास ड्रेनेज चे पाणी रस्त्यावर वहात आहे. या मुळे परिसरातील रहिवाशांना दुर्गंधी मुळे श्वास घेणे कठीण झाले आहे.  नागरिकांचे अरोग्य धोक्यात येत आहे. विशेष म्हणजे हे ठिकाण वाळुज महानगर सिडको कार्यालयाला खेटूनच आहे. सिडकोचे अधिकाऱ्यांनी झोपेतून जागे होऊन नागरिकांना भेडसावत असलेल्या या गंभीर समस्येचे निवारण करावे अशी मागणी परिसरातील  रहिवाशी करीत आहे.

     तिसगाव चे उपसरपंच नागेश कुठारे आणि उद्योजक तथा समाजसेवक नरेंद्र सिंग यादव यांनी या ठिकाणी भेट देऊन प्रशासनाकडे तक्रार केली आहे.