गंभीर आरोप : बिल्डरच्या फायद्यासाठी शासनाकडून मिळालेल्या रु.१०० कोटी निधीचा महानगरपालिकेकडून गैरवापर

गंभीर आरोप : बिल्डरच्या फायद्यासाठी शासनाकडून मिळालेल्या रु.१०० कोटी निधीचा महानगरपालिकेकडून गैरवापर

औरंगाबाद : महानगरपालिकेला १०० कोटी रुपयातून चिकलठाणा शासकीय रुग्णालय, वार्ड क्र ३७ च्या बाजुला, रस्ता क्र. 3 चौधरी कॉलनी ते सावंगी बायपास सिमेंट रस्त्याचे काम मनपातंर्गत सुरु आहे. हे काम चुकीच्या पध्दतीने व शहरी भागाच्या विकासाला फाटा देत शेतामध्ये सुरू असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) कडून करण्यात आला आहे.

       रस्त्याचे होणारे काम हे शहरी भागामध्ये दाट वस्त्यांमध्ये ज्या ठिकाणी रस्ता नाही, अशा वस्तीमध्ये झाले पाहिजे. परंतु, सावंगी बायपास रस्ता हा शेतामध्ये होत आहे. याकडे महानगरपालिकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून कानाडोळा केल्याचे दिसते. हा रस्ता बिल्डर्सच्या फायद्याचा त्यांनी केलेल्या प्लॉटींगसाठी सोयीस्कर आहे. त्यामुळे महानगरपालिकेने बिल्डर्सच्या एकटयांचे हित जोपासत हा निधी तिकडे बेकायदेशिररित्या वळती केला आहे. 

       त्यामुळे या रस्त्याचे काम तात्काळ थांबविण्यात यावे, तसेच, ज्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता हा रस्ता बनविण्याचा घाट रचला आहे, कामाची मंजुरी दिली आहे त्यांच्यावर देखील कायदेशिर कारवाई करावी, या रस्त्यासाठी मंजूर झालेला निधी हा शहरात मनपाच्या वार्डात ज्या ठिकाणी रस्ता नाही त्या ठिकाणी वळविण्यात यावा, नागरीकांना रस्ते, ड्रेनेज, पाणी या नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात, महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन या रस्त्याची शहानिशा करावी, तेव्हा आपल्या लक्षात येईल की, ही बाब कशी बिल्डर्स च्या फायद्याची आहे,त्या

     मुळे जनतेच्या पैशाचा करोडो रुपयांचा भ्रष्टाचार थाबविण्यासाठी उचित कारवाई करावी, अशा मागण्याचे निवेदन विभागीय आयुक्त कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त गव्हाणे यांच्याकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात) गटाचे जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांनी दिले यावेळी पवन पवार संदीप अहिरे उपस्थित होते.