वक्फ बोर्ड मेंबर समीर काझीनी आपल्या नावावर करून घेतली वक्फची जमीन : राज्य शासनाला कारवाईचे आदेश द्या : औरंगाबाद हायकोर्टात याचिका
औरंगाबाद, ३ ऑगस्ट : बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथील संगीन मस्जिद या वक्फ संस्थेची २७६ एकर वक्फ ची जमीन गैर कायदेशीररित्या विकणाऱ्या आणि विकत घेणाऱ्यांचे विरुद्ध राज्य शासनाला कारवाईचे आदेश द्यावेत, अशी याचिका वक्फ प्रॉपर्टी चे संरक्षणासाठी झटणाऱ्या वक्फ सेवा मंच चे अध्यक्ष आणि चार्टर्ड अकाउंटंट सय्यद आरिफ अली यांनी आज औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली.
अंबाजोगाई येथील संगीन मस्जिद च्या २७६ एकर वक्फ जमिनीपैकी अनेक एकर जमीन महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे सदस्य समीर काझी यांनी पण गैर कायदेशीर रित्या आपल्या नावावर करून घेतली, असे आरोप याचिकाकर्त्यांनी आपल्या याचिकेत पुराव्यासह हाय कोर्टासमोर मांडले आहे. संगीन मस्जिद चे या गैर कायदेशीर रित्या करण्यात आलेल्या व्यवहारासंबंधी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठी याचिकाकर्त्यांनी अनेक लेखी तक्रारी तसेच ई-मेल द्वारा तक्रारी राज्य शासनाकडे आणि वक्फ बोर्डाकडे केल्या. परंतु या गैर कायदेशीर व्यवहारामध्ये वक्फ बोर्डाचा मेंबरच गुंतलेला असल्याने त्याला वाचवण्यासाठी शासनाकडून याचिकाकर्त्याचे तक्रारींवर कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने सय्यद अरिफ अली यांनी औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली असून त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार चौकशी करून कारवाई करण्यात यावी म्हणून शासनाला आदेश द्यावेत अशी विनंती हायकोर्टाला केली आहे.
(१) अल्पसंख्यांक विकास विभाग आणि (२) अल्पसंख्यांक विकास विभाग आणि औकाफ चे मंत्री यांचे विरुद्ध ही याचिका सय्यद आरिफ अली यांचे वतीने एडव्होकेट राहुल मोटकरी यांनी दाखल केली.
वक्फ बोर्डात मेंबर म्हणून आपली वर्णी लावून घेणारे व्यक्ती वक्फ प्रॉपर्टीचे रक्षण करण्यासाठी येतात की भक्षण करण्यासाठी येतात? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या याचिकेवर चौकशीचे आणि कारवाईचे आदेश जर हायकोर्टाने दिले तर अनेक मोठे मासे अडकतील आणि त्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.