बांधकाम परवानगी व्यवस्थापन सहायता कक्षाचे (BPMS) उदघाटन

बांधकाम परवानगी व्यवस्थापन सहायता कक्षाचे (BPMS) उदघाटन

बी पी एम एस सेल मुळे वेळेची बचत होऊन बांधकाम परवानगी मिळणार

बी.पी.एम.एस सेल स्थापन करणारी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका महाराष्ट्रात प्रथम

नागरिकांना बांधकाम परवानगी प्रस्ताव हे नियमानुसार व परिपूर्ण दाखल करण्यास मदत करणे व वेळेची बचत होऊन जास्तीत जास्त बांधकाम परवानगी देणे बाबत औरंगाबाद महानगरपालिका येथे बी.पी.एम.एस सेल कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या बांधकाम परवानगी व्यवस्थापन सहायता कक्षाचे उदघाटन आज पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते संपन्न झाले.

       यावेळी आमदार प्रदीप जैस्वाल, .प्रशासक डॉ अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, शहर अभियंता ए बी देशमुख, कार्यकारी अभियंता बी डी फड, आर एन संधा, उप संचालक नगर रचना  मनोज गर्जे , उप अभियंता संजय कोंबडे, अधिकीरी, कर्मचारी उपस्थित होते.