H3 N2 व्हायरस ने घेतला महाराष्ट्रात पहिला बळी
अहमदनगर, (प्रतिनिधी) : H3 N2 इन्फ्लुंजा आणि कोरोना या दोन्ही चा संसर्ग झालेल्या मेडिकल कॉलेज मध्ये शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्यांचा अहमदनगर मध्ये मृत्यू झाला आहे. अहमदनगर येथील एका वैद्यकीय महाविद्यालयात औरंगाबादचा रहिवाशी विद्यार्थी हा शिक्षण घेत होता.
वैद्यकीय महाविद्यालयातील हा विद्यार्थी काही दिवसापूर्वी कोकणात सहलीसाठी गेला होता. तिथून परत आल्यावर त्याला त्रास जाणवू लागला. मात्र सुरुवातीला त्याने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्याचा आजार बळावला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती अहमदनगरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांनी दिली.
H3 N2 व्हायरस मुळे झालेला महाराष्ट्रातील हा पहिलाच मृत्यू आहे. याची गंभीर दखल घेत प्रशासन सावध झाले असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर घोगरे यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांचा मृत्यू हा H3 N2 इन्फ्लुंजा आणि कोरोना या दोन्ही मुळे झालेला आहे. या संसर्गामुळे त्याचे किडनीसह अनेक अवयव निकामी झाले होते. त्यातूनच त्याचा मृत्यू झाला आहे. दहा मार्च ला त्याला ताप आणि सर्दी खोकला ची लक्षणे दिसू लागली होती.