जुनी पेन्शन हवी तर, पगार पण जुनाच घ्या : एका शेतकऱ्याचा सरकारला ब्लॅकमेल करणाऱ्या नोकरांना सवाल
दिनांक 14 मार्च 2023 पासून 1 नोव्हेंबर 2005 नंतर सरकारी नोकरीवर लागलेले नोकरांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी म्हणून महाराष्ट्र राज्यातील 18 लाख सरकारी नोकर संपावर गेलेले आहेत. त्यांनी सर्वसामान्य जनतेला वेठीस धरलेले आहे. सर्व सरकारी कार्यालयातील कामे ठप्प पडलेली आहे. हे सरकारी नोकर सरकारला ब्लॅकमेल करत आहेत. सरकारी नोकरीवर लागताना त्यांना माहीत होते की त्यांना जुनी पेन्शन योजने प्रमाणे पेन्शन मिळणार नाही. तरी पण त्यांनी त्यावेळेस सरकारी नोकरी स्वीकारलेली आहे. सन 2006 पासून सन 2023 पर्यंत म्हणजे 17 वर्षात या सरकारी नोकरांची संख्या बरीच वाढल्याने ते आता जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून शासनाला ब्लॅकमेल करून शासनाला आणि सर्वसामान्य जनतेला वेठीस धरत आहेत.
एका शेतकऱ्याने सरकारला ब्लॅकमेल करणारे या संपकरी सरकारी नोकरांना एक सवाल केलेला आहे. सध्या तो सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेला आहे. तसेच त्यांनी शासनाला सुद्धा काही सूचना केलेल्या आहेत. त्या खालील प्रमाणे.....
सरकारला विनंती आहे की,
ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या योजनेनुसार पेन्शन हवी असेल त्यांना जुन्याच योजनेनुसार पगार देखिल द्यावेत. ६ वा व ७ वां पे कमिशन रद्द करावा.
आणि तरीदेखील ह्यांना संपावर जायचे असेल तर, महाराष्ट्रातील कोटी दीड कोटी तरुण तरुणी बेरोजगार आहेत, अगदी सध्याच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगाराच्या निम्म्या पगारात देखिल ते नोकरी करायला तयार आहेत, त्यांना संधी द्यावी.
सरकारी कर्मचाऱ्यांना ठणकावून सांगितले पाहिजे की, तूम्ही नोकरी करून सरकारवर उपकार करत नाही, तर उलट तुम्हाला नोकरीची संधी देऊन सरकार तुमच्यावर उपकार करते.
हे सर्व कर्मचारी माजले आहेत.
शेतकरी, कामगार, कष्टकरी, गैरसरकारी लोक
१)यांना काय पेन्शन आहे का?
२)शनिवार रविवार न काम करता पगार मिळतो का?
३)टेबल खालून पैसा मिळतो का?
४)सणवार, उत्सव ह्याला सुट्टया मिळतात का?
५)दर दोन महिन्याला कोणती पगारवाढ मिळते का?
६)दिवाळी ला बोनस मिळतो का?
७) पोरांची शाळेची, क्लास ची फी मिळते का?
८)मेडिकल बिल मिळते का?
९)कोनी साहेब साहेब म्हणते का?
१०)दोन चार वर्षांनी फुकटची पदोन्नती मिळते का? नाही ना?
मग तरी आम्ही शेतकरी, कामगार, कष्टकरी संपावर जातो का? नाही ना?
मग कशाला सहन करायची ह्या सरकारी कर्मचाऱ्यांची नाटक? ह्यांनी जर संप मागे नाहीं घेतला तर सामान्य नागरिक रस्त्यावर उतरून ह्यांच्या विरोधात आंदोलन करणार. सरकारी कर्मचारी म्हंजे पांढरा हत्ती आहे. वेळेवर “माहूताने” आवर घालावा. नाहीतर राज्य विकावे लागेल ह्यांचे लाड पुरवता पुरवता....
सरकारने भयंकर पगारवाढ केल्याने समाजात आर्थिक विषमता वाढली आहे.
१)सरकारी नोकरीला असणाऱ्या भावाचा बंगला आणि शेतकरी भावाच्या घराला साधे प्लास्टर सुद्धा नाही.
२)सरकारी भावाच्या पत्नीच्या अंगावर तोळे तोळे सोने आणि आमच्या शेतकरी भावाच्या पत्नीचे गुंजभर आहे ते पण बँकेत गहाण पडले आहे.
३)ह्यांची पोरं इंग्लिश मिडीयमला आणि शेतकरी भावाची पोरं सरकारी शाळेत दुपारचा पिवळा भात खायला.
४)ह्यांच्या पोरांना इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेणार आणि आमची पोर बीए बीकॉम करत परत घरी बसणार. ५)यांची पोर कॉलेजला चारचाकी दोनचाकी वर जाणार आमची पोर बस स्टँड वर वाट पाहत बसणार.
६)आम्हीं रात्रंदिवस उन्हातानात काम करणार, रात्रीच्या वेळेस बिबट्या, साप यांची भीती बाळगून आयुष्यभर काम करणार आणि म्हातारपणी संजय गांधी निराधार योजनेचे 1000 ची वाट पाहणार आणि हे सरकारी कर्मचारी म्हातारपणी 30 ते 40 हजार काही काम न करता घेणार.
अशी भयंकर आर्थिक विषमता समाजात निर्माण झाली आहे. आणि ती मिटवायची असेल तर सरकारने पेन्शन द्यायला नको...
सर्वसाधारण जनतेने सरकारला ब्लॅकमेल करणारी या संपकरी सरकारी नोकरांचे विरुद्ध रस्त्यावर उतरायला पाहिजे.