लालपरीत अर्ध्या तिकिटावरून वादावादी
औरंगाबाद : महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी एसटी महामंडळाच्या बसेस मध्ये प्रवास करणाऱ्या महिलांसाठी पन्नास टक्के सवलत देणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे ग्रामीण भागात लाल परीत प्रवास करणाऱ्या महिला प्रवासी आणि कंडक्टर मध्ये अर्ध्या तिकिटावरून वादावादी होताना दिसून येत आहे. या महिलांचे असे म्हणणे आहे की सरकारने महिलांसाठी अर्धा तिकीट लागणार असल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे आम्ही अर्ध्या तिकीटा व नेत्र प्रवास करणार आहोत. फुल तिकिटाचे पैसे देणार नाहीत. काय करायचे असेल तर करा. अशा प्रकारचे महिला सांगत आहेत.
महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्पात महिलांसाठी 50% सवलत जाहीर केलेली आहे ती सवलत 1 एप्रिल 2023 पासून अमलात येणार आहे. असे लाल परीचे कंडक्टर समजूत घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. ग्रामीण भागातून जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेस मध्ये प्रवास करणाऱ्या महिलांकडून असा प्रकारे वाद होण्याचे प्रमाण वाढलेले आहेत. त्यामुळे कंडक्टर त्रस्त झाले आहेत.
महाराष्ट्रातील 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर त्याची अंमलबजावणी तात्काळ सुरू झाली होती. तर आता महिलांसाठी पन्नास टक्के सवलत केल्याची घोषणा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी तात्काळ का करण्यात येत नाही? अशी विचारणा ग्रामीण भागातील प्रवासी करीत आहेत.