चक्क पोलीस चौकी समोर एका महिलेचे आमरण उपोषण : गावातील अवैध धंदे बंद करा

नांदुरा (प्रतिनिधी) : सोमवार पासून बुलढाणा जिल्ह्यात नांदुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडनेर भोलजी या गावात चक्क पोलीस चौकी समोर पोलीस प्रशासनाचे विरुद्ध आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. उमा गोपाल बोचरे असे या उपोषणकर्त्या महिलेचे नाव असून ही महिला वडनेर भोलजी याच गावातील राहणारी आहे. एका महिलेने अशा प्रकारे दृढ निश्चय घेऊन पोलीस प्रशासनाची विरुद्ध आंदोलन पुकारल्याने परिसरात या महिलेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
उमा बोचरे यांच्या मागण्या अशा आहेत;
1. अवैध दारू विकणाऱ्याकडून हप्ता/ लाच घेणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे.
2. अवैध दारू विक्री करणाऱ्या लोकांचे विरुद्ध कठोर कारवाई करून या धनगरांची समूळ उच्चाटन करण्यात यावी.
3. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कडक प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात यावी.
4. तक्रारदार आणि इतर व्हिसलब्लोअर्सची सुरक्षा आणि संरक्षण सुनिश्चित करावे.
5. दारू माफियांचे जाळे तपासण्यासाठी आणि उद्ध्वस्त करण्यासाठी विशेष कार्य दलाची (SIT) स्थापना करण्यात यावी.
6. अवैध दारू विक्री चे बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्यासाठी देशी/विदेशी दारू विक्रेत्यांचे दुकानांचे मद्य नियमित निरीक्षण आणि आकस्मिक तपासणी करण्यात यावी.
उपोषणावर बसलेल्या महिलेचा वहिद खान यांनी ट्विटरवर शेअर केलेला व्हिडिओ