कांचननगर गृहनिर्माण संस्थेच्या तीन उच्चभ्रू भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

कांचननगर गृहनिर्माण संस्थेच्या तीन उच्चभ्रू भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

औरंगाबाद : कांचननगर सहकारी गृहनिर्माण संस्था, नक्षत्रवाडीचे तत्कालीन अध्यक्ष दिवाकर देवराव कुलकर्णी व तत्कालीन संचालक पियुष सुरेश सेठी व अभिषेक देशमुख  यांचे विरोधात भारतीय दंड संहिता कलम 406 409 418 420 465 468 471 व 34 प्रमाणे सातारा पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर क्रमांक ००९७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

        पियु सुरेश सेठी संस्थेचे संचालक असून थकबाकीदार होते त्यामुळे त्यांचे संचालक पद रद्द करण्यासाठी कारवाईचे प्रकरण सहकार कायद्याप्रमाणे संस्था अध्यक्ष दिवाकर देवराव कुलकर्णी यांनीच दाखल केले व डी डी आर तालुका यांचे आदेश २९/१/२०२१ प्रमाणे संचालक पद रद्द करण्यात आले या आदेशा विरोधात विभागीय सहनिबंधक आकडे अपील दाखल झाले व तेथे अपील फेटाळले गेले.     

         विभागीय सहनिबंधक काकडे सुनावणी दरम्यान पियु सुरेश सेठी व दिवाकर देवराव कुलकर्णी यांनी प्लॉट क्रमांक 16 चे हस्तांतरण पत्र व पियु सुरेश सेठी यांच्याकडील संपूर्ण थकबाकी भरणा केली आहे असे बेबाकी प्रमाणपत्र दिले. पियु सुरेश सेठी यांच्या संचालक पद वाचवण्यासाठी दाखल झालेले हस्तांतरण पत्र व विभागीय प्रमाणपत्र संशयित असल्याची तक्रार एका सभासदाने केली व त्यावर चौकशी झाली असता हस्तांतरण पत्र तत्कालीन प्रशासक यांनी दिलेलेच नाही व हस्तांतरण केल्याचा ठराव मंजूर केलेला नाही संस्थेचे रेकॉर्ड व ऑडिटरचा रिपोर्ट आधारे प्लॉट नंबर 16 वर ३१/३/२०२१ ची थकीत रक्कम ३८९०५० व प्लॉट नंबर ५ची थकीत रक्कम ६०२०/-अशीच थकबाकी होती व या रकमेचा सोसायटी भरणा झालेला नसतानाही खोटे बेबाकि प्रमाणपत्र देऊन पियुष सुरेश सेठी यांचे संचालक पद वाचविण्याचा प्रयत्न केला.

   सध्याचे प्रशासक श्री देवकर यांनी देखील वरील कागदपत्राची सोसायटीच्या अभिलेखावर नोंद नसल्याचे प्रमाणित केले आहे डीडी कुलकर्णी तत्कालीन अध्यक्ष यांना बेबाकी प्रमाणपत्र परस्पर जारी करण्याचा अधिकार नाही कारण लेखापरीक्षण अहवालात प्लॉट नंबर 16 वर थकबाकीची रक्कम आहे बेबाकी प्रमाणपत्रावर जावक क्रमांक पण बनावट आहे.

         बनावट कागदपत्रे खोटे प्रमाणपत्र तयार करून पियु सुरेश सेठी व अभिषेक देशमुख यांनी बंगल्यासाठी असलेल्या सोसायटीच्या भूखंड क्रमांक 16 वर फ्लॅट बनवून विक्री केले व सोसायटीची फसवणूक केली आहे म्हणून गुन्हा दाखल झालेला आहे.