गुस्ताखी माफ : अमितशहांनी शतप्रतिषतची पुडी सोडली तर शिंदे गटाची अवस्था होईल घर का ना घाटका.

गुस्ताखी माफ : अमितशहांनी शतप्रतिषतची पुडी सोडली तर शिंदे गटाची अवस्था होईल घर का ना घाटका.

बाळासाहेबांचा बाळ....
खरंच खणखणीत आणि दणदणीत, चॅलेंज नाहीच....
संयम व गर्जना ही, मैदान मुलुख जिंकलं...!!!

     वाटलं होते सत्ते सोबत  जत्रा असते... त्यामुळे शिवाजी पार्क भरणार नाही. मात्र स्वर्गीय बाळासाहेबांच्या सुपुत्राने आपणच अस्सल, खरं खणखणीत नाणी आहोत.संकटकाळी लढवय्ये आहोत...हे दाखवून दिलं. पन्नासातून चाळीस आमदार गेल्या नंतर ही  मातोश्रीच्या अंगणात मोठं झालेल्या या बळाने आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत खरी शिवसेना जिवंत आहे, बाळासाहेबांच्या खऱ्या सेनेचे वीर भक्कम पणे पाठीमागे उभे आहेत हे दाखवून दिलं....
      एकूणच दसरा मेळावा म्हणजे उद्धव साठी फक्त प्रतिष्ठेची लढाई नव्हती तर अस्तित्वाची ही लढाई होती. यात फत्ते झाल्यानंतर त्यांचाच नव्हे शिवसेनेच्या महाराष्ट्रातील शिवसैनिकांचा विश्वास बळावला असेलच.
      दुसरी कडे मुख्यमंत्री एकनाथ  शिंदेंचा संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव सारखा राजकीय ठसा नाही. तरीही त्यांनी बिकेसी मैदान फुल्ल करून दाखविले. नियोजनात कोणताही कसूर केला नाही म्हणून त्यांच्या संगठन क्षमतेलाही सलाम ठोकायला हवा. मात्र त्यांच्या भाषणात जो कणखरपणा हवा होथा तसा नव्हताच. हे त्यांनी व त्यांच्या गटाने स्वीकारायला हवे. तरीही उद्धव यांच्या भाषणाला सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या भाषणात उत्तर देताना लय दिसून आली नाही म्हणूनच प्रसिद्ध पत्रकार निखिल वागळे यांनी 'शिंदे फडणवीसांनी स्क्रिप्ट वाचतांना अडखडले असल्याचा टोला लगावला.
     उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात 2019 विधानसभेच्या वेळेस सेने भाजपात सत्तेचा फरमुला काय ठरला होता? यावर  आई-वडिलांची शपथ घेऊन प्रकाश टाकला. अमितशाह यांच्या सोबत अडीच-अडीच वर्षाचा मुख्यमंत्री करण्याचा तो फारमुला होता, मात्र भाजपने ऐनवेळी नकार दिल्याचे सांगितले. गृहमंत्री फडणवीसांना ही त्यांनी कायदा व सुव्यवस्थे वर घेरले. मात्र नेमका रोख शिंदे यांच्यावर होता. 'रावण दहा तोंडाचा होता मात्र आज तो "पन्नास खोक्याचा खोकासुर" आहे. मी इस्पितळात असतांना कट करणारा "कटप्पा" आहे." हे काय साधे आरोप नाहीत. उद्धव यांनी प्रत्येक गोष्टींचा उलगडा करत भावनिक साद घातली. "तुमच्या बुडाला मंत्रीपदे चकातली असतील पण कपाळावरील  गद्दारीचा टीका आयुष्यभर पुसता येणार नाही."  उद्धव यांनी बाळासाहेबांच्या शैलीतील अनेक वाक्य बोलून उपस्थितांना बांधून ठेवले. म्हणूनच जर उद्धव यांच्या बुलंद आवाजाने बंड केलेल्यांत विधानसभा निवडणुकी पर्यंत चलबिचल असणार आहे.
     वडिलांच्या वारसाने शिवसेनेला पुढे नेणाऱ्या उद्धव ठाकरेंनी या शिवाजीपार्क वर पुन्हा एकदा आपली राजकीय क्षमता सिद्ध केली आहे. म्हणूनच  अनेक राजकीय विश्लेषकांनी त्यांनी महा मुकाबल्यात विजय मिळविल्याचे सांगितले. सत्ते  समोर लोटांगण घालणाऱ्या मीडियाने त्यांना स्पेस दिला नाही मात्र त्यांच्या भाषणाची क्लिप सोशियल मीडियावरील क्लिप महाराष्ट्राच्या जनसामान्यांच्या मनावर घर करत आहेत. त्यांनी आरोप-प्रत्यारोपासोबतछ जनतेच्या प्रश्नांना ही हात घातला. वाढती बेरोजगारी व महागाईचा मुद्दा उचलून केंद्र सरकारला ही घेरण्याचा प्रयत्न केला.
     शेवटी, पुढच्या दोन वर्षात (भाजपने शिंदेंना ठेंगा दाखविला नाही तर) हा राजकीय कलगीतुरा चालूच राहणार आहे. निवडणुकीत कोण किती पाण्यात आहे कळेलच. मात्र उद्धव यांची घणाघाती वाटचाल तो पर्यंत चालू राहीली तर बंड केलेल्या चाळीस पैकी दहा जणांनाही विधानसभेची पायरी चढता येणार नाही. शिंदेंचे मुख्यमंत्रीपद व राजकीय भविष्य भाजपच्या मेहेरबानीच्या दांड्यावर टिकलेले आहे. जो पर्यंत त्यांना वाटेल तो पर्यंत ठीक, मात्र जेव्हा अमितशहा "शतप्रतिषतची" पुडी सोडतील तेव्हां शिंदे गटाची अवस्था "घर का ना घाटका" अशी होईल. कारण राजकारणात काही ही शक्य आहे. भाजपचा इतिहास सर्वांना माहीतच आहे. बिच्चारे....शिंदें जनसामान्यांचा नेता असतांना फडणवीस इतके चलाख नाहीत. मोजून मापून पाय टाकावे... नसता त्यांची "पिछे कुआ, सामने खाई" असं व्हायला नको....!!
(जयहिंद)????

-अशफाक शेख,वरिष्ठ पत्रकार, औरंगाबाद,

  (94222 08577)