‘डी-24 न्यूज’च्या यशस्वी वाटचालीला मान्यता – आरेफ देशमुखांचा सन्मान

‘डी-24 न्यूज’च्या यशस्वी वाटचालीला मान्यता – आरेफ देशमुखांचा सन्मान

छत्रपती संभाजीनगर, दि.14 (प्रतिनिधी) – अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडीया परिषदेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन आज संत एकनाथ रंगमंदिर येथे उत्साहात पार पडले. या अधिवेशनात मराठी डिजिटल पत्रकारितेच्या वाढत्या प्रभावाला अधोरेखित करत नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून वाचकांपर्यंत पोहोचण्याचे महत्त्व मांडण्यात आले.

        डिजिटल माध्यमातून सातत्याने दर्जेदार व ताज्या बातम्या देत वेगळा ठसा उमटवणाऱ्या डि-24 न्यूज वेबपोर्टलने मागील पाच वर्षांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या योगदानाची दखल घेत या पोर्टलचे संपादक ज्येष्ठ पत्रकार आरेफ देशमुख यांना अधिवेशनात  मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

     या प्रसंगी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड, परिषद अध्यक्ष मिलिंद अष्टिवकर, ज्येष्ठ संपादक तुळशीराम भोईटे, ज्येष्ठ पत्रकार अब्दुल कदीर, ज्येष्ठ पत्रकार स.सो. खंडाळकर, अभिव्यक्ती न्यूज चॅनलचे रवींद्र पोखरकर यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.

      तसेच परिषद पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष अनिल वाघमारे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, कार्याध्यक्ष सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, गणेश मोकाशी, गो.पी. लांडगे, हेमंत वणजू, प्रकाश कांबळे, जिल्हाध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, मुंबई प्रतिनिधी सुनील वाघमारे, सचिव प्रकाश भगनुरे, उपाध्यक्ष महादेव जामनिक, उपाध्यक्ष ब्रम्हानंद चक्करवार, कार्याध्यक्ष कानिफ अन्नपुर्णे आदींचा समावेश होता.

       सन्मान मिळाल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार आरेफ देशमुख यांचे पत्रकारीता क्षेत्रात विविध स्तरावर अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या या कार्यामुळे डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रातील नवोदितांना प्रेरणा मिळणार असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.