औरंगाबाद शहरात ईडी ची ९ ठिकाणांवर छापेमारी

औरंगाबाद शहरात ईडी ची ९ ठिकाणांवर छापेमारी

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात ईडीने (ENFORCEMENT DIRECTORATE) वेगवेगळ्या नऊ ठिकाणी आज सकाळी छापेमारी केली आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत बांधकामासाठी काढण्यात आलेल्या टेंडर मध्ये घोटाळा झाल्या प्रकरणी ईडीची ही छापेमारी होत असल्याची माहिती समोर आली आहे. 

          विशेष म्हणजे या प्रकरणी औरंगाबाद शहरातील पोलीस स्टेशन सिटी चौक येथे घोटाळेबाजांचे विरुद्ध औरंगाबाद महानगरपालिके द्वारा देण्यात आलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आर्थिक गुन्हे शाखेद्वारे प्रकरणाचा तपास सुरू आहे. ‌ कोट्यावधी रुपयाचा हा घोटाळा असल्याने ईडीने सुद्धा या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्याच संदर्भात ही छापेमारी सुरू आहे.

          औरंगाबाद महानगरपालिका अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेसाठी चाळीस हजार घरे बांधण्यासाठी टेंडर काढण्यात आले होते. हे टेंडर घेण्यासाठी त्यावेळी रमरथ कन्स्ट्रक्शन, जग्वार ग्लोबल सर्विसेस आणि ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस नी टेंडर भरले होते.  परंतु हे टेंडर एकाच आयपी ऍड्रेस वरून भरण्यात आल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्याने महानगरपालिकेची अशी खात्री झाली होती की या तिन्ही कॉन्टॅक्टर कंपन्यांनी संगणमत करून कट रचून आपलीच चेन तयार करून ई टेंडर भरले होते. अटींचे उल्लंघन झाल्यामुळे या कंपन्यांविरुद्ध व इतर अज्ञात लोकांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास सुरू असताना ईडीने या टेंडर संदर्भातील कागदपत्रे याआधीच हस्तगत केली होती. सध्या ईडीची छापेमारी सुरू आहे....