अर्थसंकल्पावर खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया
▪️महाराष्ट्रातील अनेक शैक्षणिक संस्थांना विशेष निधी देण्याची घोषण करण्यात आली आहे. औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या पिपल्स् एज्युकेशन सोसायटी (पीईएस) च्या माध्यमातुन सुरु करण्यात आलेल्या शैक्षणिक संस्थांना विशेष निधी का देण्यात आला नाही ? येथे विशेष करुन शिक्षण घेणारे विद्यार्थी हे गोरगरीब मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजाचे असल्यामुळे सरकारने विशेष तरतुद करण्याची आवश्यकता होती.
▪️आशा वर्कर यांचे काम पाहता त्यांना तुटपुंजी मदतीची घोषणा करण्यात आली; किमान २०,००० रुपये मानधन देण्याचे अपेक्षित होते.
▪️महाराष्ट्रात स्मारकासाठी १००० कोटी रुपयाची तरतुद करण्यात आली आहे. त्याऐवजी हा निधी ग्रामीण भागातील शाळांमध्ये सोयीसुविधा पुरविण्यासाठी आणि विशेष करुन औरंगाबाद जिल्ह्यातील ज्या १६०० शाळा टिनशेड खाली सुरु आहे त्या ठिकाणी पैसे वापरण्यात आले असते.
▪️राज्यातील ५ शहरामध्ये मेट्रोरेल प्रकल्प राबविण्यासाठी ३९००० हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्याऐवजी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असुन ते पैसे ग्रामीण भागातील रस्त्यासाठी वापरले असते तर याचा थेट फायदा शेतकरी बांधवांना झाला असता.
▪️सरकारने महाराष्ट्रात नविन १४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मी स्वत: एक जनहीत याचिका दाखल केलेली आहे. ज्यामध्ये सद्यस्थितीत अनेक शासकीय रुग्णालयामध्ये मोठ्या संख्येने डॉक्टर्सची पदे अनेक वर्षापासून रिक्त आहे. मग नविन रुग्णालयामध्ये नविन डॉक्टर्सची पदे कसे व कुठुन भरता येईल याचा विचार सरकारने करावा.
▪️औरंगाबादच्या करोडी येथे नविन क्रीडा विद्यापीठासाठी आम्ही जे जनआंदोलन उभे केले होते; त्याच्यासाठी सरकारने ५० कोटीची तरतुद केली आहे त्याचा आम्ही स्वागत करतो. तसेच औरंगाबाद विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी जमीन अधिग्रहण करणेस्तव केलेल्या तरतुदींचा सुध्दा आम्ही स्वागत करतो.
▪️महाराष्ट्रात ३००० शेतकरी बांधवांनी आत्महत्या केलेली असतांना अशा परिस्थितीत एक रुपयामध्ये शेतकरी बांधवांना पिक विमा करता येईल, हे फक्त एक जुमला आहे. शेतकरी बांधवांना दिल्या जाणार्या नमो शेतकरी सन्मान योजना अंतर्गत १००० रुपये प्रति महिना मिळेल हा निर्णय सर्व शेतकरी बांधवांची चेष्टा करणारा आहे.
▪️औरंगाबाद जालना रोडवर अखंड उड्डाणपूलासाठी आणि शिवाजी नगर येथील भुयारी मार्गासाठी काही ही तरतुद करण्यात आलेली नाही हे खेदजनक आहे.