पोलीस इन्स्पेक्टरसाठी तीन लाख रुपये लाचेची मागणी : दोघे एसीबी च्या जाळ्यात
पुणे : पोलीस इन्स्पेक्टर साठी तीन लाख रुपये लाचेची मागणी करणाऱ्या दोघांना अँटी करप्शन अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. तक्रारदाराने पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस निरीक्षकाला तीन लाख रुपये लाच द्यावी लागेल अशी मागणी या दोघांनी तक्रारदारास केली होती.
या प्रकरणाबाबत मिळालेली माहिती अशी आहे की पुणे जिल्ह्यातील सासवड पोलीस स्टेशन मध्ये तक्रारदाराने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली होती. त्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यासाठी सासवड पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षकाला तीन लाख रुपये द्यावे लागतील तेव्हाच गुन्हा दाखल होईल अशी बतावणी तक्रारदारास करून तीन लाख रुपये लाचेची मागणी दोन खाजगी इस्मानी केली. मागणी करणारे इसमांची नावे अक्षय सुभाष मारणे आणि गणेश बबनराव जगताप दोन्ही राहणार सासवड जिल्हा पुणे अशी आहे.
लाचेची मागणी करणारा जगताप हा पुणे जिल्ह्यातील एका मोठ्या राजकीय नेत्याचा जवळचा नातेवाईक असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस निरीक्षकासाठी या दोघांनी तीन लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे पडताळणीअंती निष्पन्न झाल्याने या दोघांचे विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार पुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे. खरोखरच सासवड पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकाने लाचेची मागणी करण्यासाठी या दोघांना सांगितले होते का? याबाबत अँटीकरप्शनचे अधिकारी सखोल तपास करीत आहेत.
सदरची कारवाई अँटी करप्शन विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस उपअधीक्षक क्रांती पवार, पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुकुंद आयाचित, पोलीस कॉन्स्टेबल तावरे, चालक पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग माळी यांनी केली.