राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वराज्य ध्वज संत सोपानदेवांच्या समाधी काठी सासवड मुक्कामी
महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा भारताच्या कानाकोप-यात पोहोचावी म्हणून गेल्या नऊ सप्टेंबर पासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून अथक प्रवास करणारी स्वराज्य ध्वज यात्रा आज सासवड मुक्कामी पोहोचली. बहुतांश जिल्ह्यांतून तिथल्या प्रेरणास्थळांना अभिवादन करत यशस्वीरीत्या वाटचाल करणारी राष्ट्रवादी काँग्रेसची स्वराज्य ध्वज यात्रा प्रवासाच्या शेवटच्या आठवड्यात पुणे जिल्हा व नजीकच्या परिसरातील स्थळांना भेट देत आहे. आतापर्यंत कोविडसारख्या महामारीच्या संकटाच्या काळातही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सर्व नियम पाळत आणि मोजक्याच माणसांच्या उपस्थितीत स्वराज्य ध्वजाचे सर्वत्र स्वागत होत आहे. सर्वांच्या अभिमानाचा विषय ठरलेला स्वराज्य ध्वज विक्रमी उंचीचा असल्याने तसेच विक्रमी सलग वाटचाल करत असल्याने त्याची दखल देशपातळीवरही घेतली जात आहे. पुणे जिल्ह्यातील सासवडमध्ये असणा-या संत ज्ञानेश्वरांचे बंधू संत सोपानदेव यांच्या संत सोपानकाका संजीवन समाधी मंदिरात आज यात्रा पोहोचली. या ठिकाणी त्यांनी जिवंत समाधी घेतली होती, तिथेच चांबळी नदीकाठी हे मंदिर निर्माण करण्यात आले. या अशा पवित्र मंदिरात आज स्वराज्य ध्वजाचे पूजन करण्यात आले. त्यावेळेस काँग्रेसचे पुरंदरचे आमदार संजय जगताप, राहुल गिरमे, बंदुकाका जगताप, संतोष जगताप, बाळासाहेब भीतंडे, अतुल जगताप, चतन जाधवराव, शुभम पोमन, मयूर पोमन, शुभम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांच्या सक्षम मार्गदर्शनाने स्वराज्य ध्वजाची ही मोहिम लोकांकडून प्रशंसा मिळवत अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांमधून फिरताना हजारो नागरिकांना स्फूर्ती संदेश देऊन प्रेरीत करण्याचं महत्त्वाचं काम हा स्वराज्य ध्वज करतो आहे. ७४ फूट उंचीच्या या अनोख्या भगव्या ध्वजाने जागतिक विक्रमाशी बरोबरी केली आहे. सध्याच्या काळात महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षेपी व आदर्श स्वराज्याची आठवण करून देण्यासाठी ही नावीन्यपूर्ण कल्पना राज्यात यशस्वीरीत्या राबवल्याबद्दल राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांचीही सर्वत्र प्रशंसा होत आहे.
महाराष्ट्राची वीररसपूर्ण गौरवशाली परंपरा देशभर पोहोचवण्यासाठी गेले तेवीस दिवस सातत्याने स्वराज्य ध्वज मोहिमचे वाहन राज्यातील सर्व जिल्हयात तसेच देशात फिरत आहे. हि ध्वज यात्रा आतापर्यंत सुमारे २५ जिल्ह्यांमधून पोहोचली आहे. अनेक जिल्हा, शहरे, गावांमधून स्थानिकांनी स्वराज्य ध्वजाला मनापासून आशिर्वाद दिले आहेत. सुमारे तीन आठवडे कोविड साथरोगाच्या काळातही कोविडसंबंधीचे सर्व आवश्यक नियम पाळून अत्यंत नियोजनबद्ध रितीने स्वराज्य ध्वज मोहिम राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून महत्त्वाकांक्षी प्रवास करत आहे. सर्व जिल्ह्यांमधून स्वराज्य ध्वजाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
शक्ती, निष्ठा, संयम, प्रगती, त्याग, संघर्ष व समतेचे प्रतीक असलेल्या स्वराज्य ध्वजाने राज्यातील अनेक शहरांमध्ये पोहोचून तिथल्या स्थानिकांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा वसा घेतलेला आहे. स्वराज्य ध्वजाच्या या प्रवास मोहिमेला समाजातील सर्वच थरांमधून उत्फुल्ल प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत हजारो नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या स्वराज्य ध्वजाला अभिवादन करून स्फूर्तीमय अनुभव घेतला आहे.
महाराष्ट्राच्या तेजोमय इतिहासाचा वारसा सांगणा-या स्वराज्य ध्वजाचे राज्यात ठिकठिकाणी जोषपूर्ण प्रतिसादात स्वागत होत आहे. प्रवासातील खराब हवामान, मुसळधार पाऊस, वाहतूकीतील अडचणी इत्यादी अडथळ्यांची पर्वा न करता वाटचाल सुरू ठेवत या ध्वज पूजन मोहिमेने आपला यशस्वी प्रवास सुरूच ठेवला आहे. आतापर्यंत राज्यातील यशस्वी प्रवासाशिवाय राज्याबाहेरील चार राज्यांमध्ये देखील हि ध्वज यात्रा पोहोचली आहे.
सर्व जातीधर्मांच्या लोकांसाठीचा हा वैशिष्टयपूर्ण ७४ मीटर उंच भगवा ध्वज महाराष्ट्रातील हिंदवी स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाची माहिती सर्वदूर पोहोचवण्यासाठी कोरोना साथी संबंधित सर्व सामाजिक नियमांचे पालन करत प्रवास करणार आहे अशी माहिती स्वराज्य ध्वजाचे संकल्पनाकार आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. महाराष्ट्राचा अभिमानास्पद इतिहास युवावर्गाला प्रेरणा देणारा असून अवघ्या देशवासियांपर्यंत हा इतिहास पोहोचवण्याच्या हेतूने हि स्वराज्य ध्वज यात्रा सुरू करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
भगव्या ध्वजाला आपल्या परंपरेत धार्मिक, आध्यात्मिक, सामरिक महत्त्व आहे. याच कारणांमुळे तसेच कर्जत-जामखेडची नवी ओळख तयार करण्याच्या दृष्टीकोनातून आपण स्वराज्य ध्वज संकल्पनेला ध्वज मोहिम यात्रेचं मूर्त स्वरूप दिल्याचं रोहित पवार यांनी सांगितलंय.
दस-याच्या शुभमुहूर्तावर १५ ऑक्टोबर रोजी या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना होत असून तत्पूर्वी महाराष्ट्रातील राजर्षी शाहू-ज्योतिबा फुले-डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, प्रमुख देवस्थानांसह देशातील प्रमुख संतपीठे, शौर्यपीठे आणि धार्मिक पीठे तसेच श्रीराम मंदिर (अयोध्या), मथुरा-वृंदावन, केदारनाथ(उत्तराखंड), आग्रा किल्ला, अजमेर शरीफ दर्गा(राजस्थान), महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड(तिसरे), बडोदा संस्थानचे अधिपती, गुजरात अशा ७४ वंदनीय ठिकाणी नेऊन या ध्वजाचे पूजन होत आहे. या सर्वसमावेशक ध्वजाचे सर्वांनीच प्रातिनिधिक पूजन करावे हि या प्रवासामागील लोकभावना आहे. त्यासाठी राज्यातील ३६ जिल्हे आणि सहा राज्यांसह १२ हजार कि.मी असा सलग ३७ दिवस या ध्वजाचा प्रवास होईल. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील शिवपट्टण किल्ल्यावर मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रेरणादायी ध्वजाची मानाने प्रतिष्ठापना होईल.
हि स्वराज्य ध्वज पूजन यात्रा पूर्णपणे लोकसहभागातून आणि सहकार्यातून संपन्न होणार आहे. यासंबंधीची अधिक माहिती https://rohitpawar.org/swarajyadhwaj/ या संकेतस्थळावर पाहाता येईल. अधिक माहितीसाठी ९६९६३३०३३० या क्रमांकावर संपर्क करा.