पहिले मायनॉरिटी कमिशनर मोईन ताशिलदार यांचे औरंगाबादेत आगमन : महाराष्ट्र वक्फ मुव्हमेंट द्वारा स्वागत
औरंगाबाद, २५ जून : महाराष्ट्र शासनाने अल्पसंख्यांकांचे सर्वांगीण विकासासाठी निर्माण केलेले अल्पसंख्यांक आयुक्तलयाचे पहिले आयुक्त मोईन ताशिलदार यांचे आज दुपारी ०३:४० वाजता औरंगाबादेत आगमन झाले. त्यावेळी हज हाऊस येथे महाराष्ट्र वक्फ मुव्हमेंट चे अध्यक्ष रिटायर्ड एसीपी रियाज़ुद्दीन देशमुख, अझ़हर खान, इलियास खान इत्यादींनी त्यांचे स्वागत केले.
बुधवार दिनांक २६ जून रोजी अल्पसंख्यांक आयुक्तालयाचे औरंगाबाद हज हाऊसच्या इमारतीत अल्पसंख्यांक विकास विभागाचे मंत्री अब्दुल सत्तार यांचे शुभ हस्ते उदघाटन होणार आहे.
अल्पसंख्यांक आयुक्तलयाचे कार्यालय तूर्त औरंगाबाद हज हाऊस चे इमारतीतील तीन खोल्यांमध्ये सुरू केले जाणार असून नंतर कार्यालयासाठी शासनाने मंजूर केलेल्या पाच एकर जागेमध्ये अल्पसंख्यांक आयुक्तालय स्थलांतर केले जाईल. त्या ठिकाणी अल्पसंख्यांक आयुक्तालयाचे कार्यालयासोबतच महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे कार्यालय, महाराष्ट्र वक्फ ट्रॅबुनल चे न्यायालय, मौलाना आज़ाद अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडळाचे राज्यस्तरीय कार्यालय तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने पण बांधली जाणार आहेत. अशी माहिती आयुक्त मोईन ताशिलदार यांनी दिली.
औरंगाबाद हज हाऊस मधील मस्जिद मध्ये अल्पसंख्यांक आयुक्तालयाचे कार्यालय थाटले जाणार असल्याच्या अफवा मुस्लिम समाजात पसरलेल्या आहेत याबाबत त्यांना आमच्या प्रतिनिधींनी विचारणा केली असता आयुक्त मोईन ताशिलदार यांनी स्पष्ट केले की, अल्पसंख्यांक आयुक्तालयाचे कार्यालय हज हाऊसचे दुसऱ्या माळावरील मस्जिदच्या जागेवर सुरू होणार नसून तळमजल्यावरील तीन खोल्यांमध्ये सुरू केले जाणार आहे.