पोलीस मदतीसाठी नागरिकांना आता 100 नंबर सोबतच 112 नंबर..!

पोलीस मदतीसाठी नागरिकांना आता 100 नंबर सोबतच 112 नंबर..!

आपण कुठेही वाईट परिस्थितीमध्ये असलो, अडचणीत असलो तर आपण पोलिसांना संपर्क करतो, त्यासाठी आपण 100 नंबर डायल करतो. आपण ज्या जिल्ह्यात किंवा शहरात असतो तेव्हा 100 नंबर डायल केल्यानंतर त्या त्या शहराचे किंवा जिल्ह्याचे पोलीस नियंत्रण कक्षाशी फोन कनेक्ट केला जायचा.

परंतु आता संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना 112 हा हेल्पलाइन क्रमांक वापरावा लागणार आहे.

112 नंबर डायल करताच महाराष्ट्रातील नागरिकांना पाच मिनिटात पोलिसांची मदत मिळू शकेल. महाराष्ट्र इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टिम अर्थात महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणे अंतर्गत ही मदत पुरवली जाईल. 

या नंबरवर कॉल केल्यावर पोलिसांना लोकेशन सुद्धा कळणार आहे. ज्यामुळे पुढील कारवाई ला गती मिळेल. यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील आणि आयुक्तालयामधील पोलीस ठाण्यांचे कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच स्वतंत्र चारचाकी आणि दुचाकी वाहने देण्यात आली आहे. 100 नंबरचे कॉल सुद्धा आज पासून 112 वर वळवण्यात येत आहेत. पोलिसांकडून पाच मिनटांच्या आत मदत मिळणार आहे.

पोलीसांचे गैरवर्तनुकीविरुद्ध तक्रार कुठे व कशी करावी हे जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा