इस्लाम - द अल्टिमेट आर्ट ऑफ लिव्हिंग : लेखक आर्किटेक्ट अर्शद शेख यांचे मनोगत

इस्लाम - द अल्टिमेट आर्ट ऑफ लिव्हिंग : लेखक आर्किटेक्ट अर्शद शेख यांचे मनोगत

           अज्ञान हे भीतीचे कारण असते. भीतीमुळे असुरक्षितता आणि असुरक्षिततेमुळे द्वेष व तिरस्काराची भावना निर्माण होते. नेमकी हीच परिस्थिती इस्लामविषयी देशबंधवांत निर्माण झाल्याचे निदर्शनास येते. सफलता, शांतता आणि सुरक्षा प्रदान करणाऱ्या या ईश्वरी जीवनव्यवस्थेचे विकृतीकरण करण्याचे षड्यंत्र रचून इस्लाम धर्म हा मानवजातीसाठी सगळ्यात मोठा धोका असल्याचे चित्र रेखाटले जात आहे.

          गोबेल्सच्या नियमाप्रमाणे एक खोटी गोष्ट अनेक वेळा सांगितली की ती खरी वाटते, त्यामुळंच इस्लामची प्रतिमा मलीन करण्यात काही गेले अनेक दशकांपासून सुरू आहे. देशासमोर अनेक गंभीर समस्या असताना देखील त्याहीपेक्षा जास्त गंभीर धोका इस्लाम असल्याचे आभासी चित्र उभे करून आपले राजकीय हेतू साध्य केले जात आहेत.

          जनसामान्यात इस्लामची शिकवण एकतर विरोधकांच्या अपप्रचाराच्या माध्यमातून पोहोचली किंवा काही तथाकथित पुरोगामी, सुधारणावादी आणि सत्तासक्त मंडळीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न झाला, ज्यांना स्वतःलाच इस्लामचा थांगपत्ता नव्हता किंवा अशा तत्वविचारांमधून पोहोचला ज्यांनी स्वतः व्यवहार आचरून पाहिला नाही. त्यामुळे ह्या धर्माच्या सत्य स्वरूपात लोकांसमोर कधीच आला नसावा. म्हणूनच या विचारधारेविषयी अस्पष्टता, अज्ञान आणि गैरसमज निर्माण झाले.

          वास्तविक पाहता कोणत्याही धर्माच्या संकल्पना त्याच्या मूळ स्रोतांत समजून घ्याव्या लागतात, तेव्हाच त्याचा खरा आत्मा लक्षात येतो. त्याच प्रकारे धर्माच्या एखाद्या पैलू, स्वतंत्राच्या समजण्यासही देखील त्याच्या मूळ संकल्पना माहिती असणे आवश्यक असते. अपुरी आणि अर्धवट माहितील्य आधार कोणत्याही धर्माविषयी मत बनविणे अज्ञानाचे प्रतीक आहे.

        या पुस्तकाच्या माध्यमातून मी आपल्या समोर इस्लामच्या संकल्पना त्याचे मूळ स्रोत अर्थात कुरआन आणि हदीसच्या माध्यमातून प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकाचा उद्देश इस्लामच्या जीवनव्यवस्थेची अधिकृत माहिती आपण पर्यंत पोहोचविणे आहे. या माध्यमातून निश्चितच इस्लाम विषयी गैरसमज आणि अज्ञान दूर होतील. परिणामी पूर्वग्रह आणि असुरक्षिततेचे ढगही दूर होऊन आपसात विश्वास आणि स्नेह निर्माण होण्यास मदत होईल अशी माझी अपेक्षा आहे. शांतता, सौहार्द आणि बंधु-भावा शिवाय कोणतेही समाज प्रगती करू शकत नाही.  सामाजिक जीवनात वेगवेगळ्या विचारधारा प्रचलित असतात, त्यांचा आदर व परस्पर विश्वास निर्माण झाल्यास प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतात. या पुस्तकाच्या माध्यमातून भारतीय समाजात प्रेम, विश्वास व बंधुता निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे.
निर्मिकाच्या आज्ञापालनाच्या कृतिला इस्लाम म्हणतात. इस्लाम म्हणजे समर्पण. इस्लामचा दुसरा अर्थ 'शांती' असा होतो. त्याचा एक अर्थ सलामती म्हणजे सुरक्षा असा आहे.

            ईश्वर हा सर्व ब्रह्मांडाचा निर्माता आणि पालनकर्ता आहे. आपण सर्व मानववाती त्याची निर्मिती आहोत. ईश्वरीय जीवनव्यवस्था कोणत्याही एका समाजाची जहागिरी नसून ती सर्व मानवजातीसाठी वरदान आहे. सर्वांना त्यावर समानहक्क आहे. यशस्वी आणि शांती प्राप्त करणे सर्वांचं ध्येय आहे. म्हणून ईश्वरीय जीवनव्यवस्था सार्वत्रिक आहे. तसेच सत्य हे कोण्या एका वंशाचे किंवा समुदाय विशेषाचे संपत्ती नाही. सत्य जाणून घेणे हे सर्वच मानवजातिचा अधिकार आहे.

          हे पुस्तक इस्लाममध्ये असलेल्या व्यावहारिक परीपक्व आहे. पुस्तकाचे नाव 'इस्लाम – अ अल्टिमेट आर्ट ऑफ लिव्हिंग' ठेवण्यात आले आहे, कारण ही अत्यंत सोपी, सहज, चैतन्यमय आणि निर्धार युक्त व्यवस्था आहे तुमच्या, माझ्या आणि आपण सर्वांच्या ईश्वराने मानवाला दिलेली सर्वोत्तम जीवनव्यवस्था आहे. ईश्वर सर्व चुकांपासून पवित्र आहे, म्हणूनच त्याचे मार्ग मानवाला सफल जीवनाचा अद्भुत मार्ग दाखवू शकतो.
प्रवक्त मुहम्मद (स.अ.) हे इस्लामचे धर्माचे संस्थापक नाहीत. इस्लाम हा जगातील सर्वात पुरातन धर्म आहे. सृष्टीच्या पावित्र्याच्या आलोकात पहिला मानव, आपल्या सर्वांचा आदिपिता 'आदम' (अ.ले) यांचे इस्लाम धर्म अर्थात ईश्वरीय जीवन व्यवस्था आली. ईश्वराने जगाच्या वेगवेगळ्या भागात लोकांच्या मार्गदर्शनासाठी प्रवक्ती आणि ईश्वार्य ग्रंथ पाठविले. या सर्व प्रवक्त्यांनी निर्मिकाने दिलेल्या जीवनपद्धतीचं मार्गदर्शन केले. आदम (अ.ले) हे सर्वात पहिले प्रवक्ते होते.

          आरपणीय मुहम्मद (स.अ.) हे अंतिम प्रवक्ते आहेत. तसेच कुरआन हे अंतिम ईश्वग्रंथ आहे. जगातील प्रचलित धर्मांची नावे एखाद्या व्यक्ती किंवा विशेष जातीच्या नावाने असतात. इस्लाम हे जाती विशेषाचे नाव नसून एक विशेष नाव आहे. अर्थात ईश्वराच्या प्रस्थापनेसाठी सतत मानवाचा चरित्र, नीती, आचार आणि प्रत्त्येकाचा दृष्टिकोन ईश्वरविषयी धर्माचा उद्देश मानवाच्या चारित्र, आचार आणि प्रत्त्येकाच्या दृष्टिकोन स्थानापर्यंत पोहचून त्याला भौतिक आणि पारलौकिकदृष्ट्या सफल करणे आहे. म्हणूनच यास आवश्यकतेनुसार कालानुसार होत नाही.
ईश्वरीय धर्माचा अर्थ मूळ बुद्धिसंगत, वस्तुनिष्ठ, तार्किक आणि स्वाभाविक जीवन पद्धती असा होतो. ही व्यवस्था अत्यंत सरळ, सोपी आणि व्यवहार्य देखील असते. ईश्वरीय धर्म माणसाच्या जीवनाला एक महान उद्देश देतो आणि त्या उद्देशाला साध्य करण्यासाठी एक कार्यप्रणाली देतो. ही व्यवस्था आनंददायी, प्रेरणादायी आणि शाश्वत असते.

           ज्ञानाचा महासागर असलेल्या या तत्त्वज्ञानाला मी अत्यंत संक्षिप्त आणि मोजक्या शब्दात आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रयत्नात माझ्याकडून काही चुका झाल्यास मला क्षमा करावी. या पुस्तकाच्या लेखनात परोक्ष–अपरोक्षरित्या सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.
मी प्रार्थना करतो की या पुस्तकाच्या माध्यमातून आमच्या भारतीय समाजात बंधुभाव, सौहार्द आणि प्रेम वृद्धिंगत होऊ दे!

- आर्किटेक्ट अर्शद शेख,