पुनम हॉटेल : ‘झन्ना-मन्ना’ जुगाराचा पर्दाफाश; स्थानिक पोलिसांवर प्रश्नचिन्ह
छत्रपती संभाजीनगर, दि. ३० ऑगस्ट २०२५: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी सावंगी येथील पुनम हॉटेलला लागून असलेल्या पत्र्याच्या खोलीमध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर २९ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता छापा टाकून २४ जणांना अटक केली आहे. या कारवाईत १,६३,२०० रुपये रोख, १५,००० रुपयांचे जुगाराचे साहित्य, २,२०,००० रुपयांचे मोबाइल हँडसेट आणि ८,४०,००० रुपयांच्या वाहनांसह एकूण १२,३८,२०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही गोपनीय माहिती अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांना मिळाल्याने ही कारवाई यशस्वी झाली.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक यांचे वाचक सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर रामकिसन गोरे यांनी त्यांचे सहकारी पोलीस हवालदार किशोर राजपूत (पोह/२२९), रामसिंग सुलाने (पोह/५४९), शेरू तडवी (पोह/१३३६) पोलीस नाईक जारवाल (पोना/११४८) पोलीस कॉन्स्टेबल जोनवाल (पोकॉ/२०९) शासकीय फोटोग्राफर फुलारे यांचे सह केली. याशिवाय, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस मुख्यालयातील एक प्लाटून तुकडी या कारवाईत सहभागी होती.
अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, सावंगी येथील पुनम हॉटेलला लागून असलेल्या पत्र्याच्या खोलीत ‘झन्ना-मन्ना’ नावाचा पत्त्यांचा जुगार मोठ्या प्रमाणात खेळला जात असल्याचे समजले. सिद्धेश्वर गोरे यांना या ठिकाणी छापा टाकण्याचे अधिकृत पत्र देण्यात आले. पथकाने पंच साक्षीदारांसमोर लपत-छपत जाऊन सायंकाळी ७ वाजता छापा टाकला. त्यावेळी काही व्यक्ती पत्त्यांचा जुगार खेळताना आढळल्या. कारवाईदरम्यान ५ ते ६ जण पळून गेले, परंतु २४ जणांना पकडण्यात यश आले.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या २४ आरोपींची नावे, वय आणि पत्ते खालीलप्रमाणे आहेत:
1. अक्षय अशोक मगरे, वय २७, रा. चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर
2. सोमनाथ साईबाबा श्रीरंग, वय ३०, रा. कोठवालपुरा, छत्रपती संभाजीनगर
3. संदीप प्रकाश हिवराळे, वय ३९, रा. जुबली पार्क, छत्रपती संभाजीनगर
4. डिंगबर रामराव गाडेकर, वय ३६, रा. मोहरा, ता. कन्नड
5. महीद्रा चंद्रशेखर जैन, वय ५७, रा. शहागंज, छत्रपती संभाजीनगर
6. संदीप कैसरीनाथ बोराडे, वय ३९, रा. चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर
7. चंदन शांतालाल पहाडीये, वय ४९, रा. चेलीपुरा, छत्रपती संभाजीनगर
8. शिवाजी रामभाऊ चाळगे, वय ४८, रा. वानखेडे नगर, छत्रपती संभाजीनगर
9. शेख भिकन शेख शकील, वय ४३, रा. रहमानिया कॉलनी, छत्रपती संभाजीनगर
10. राजू प्रकाश बटावाले, वय २५, रा. शहागंज, छत्रपती संभाजीनगर
11. अभिमन्यु सांडुलाल पहाडीया, वय ३७, रा. शहागंज, छत्रपती संभाजीनगर
12. योगेश रामकिसन पिठोरे, वय ३२, रा. चेलीपुरा, छत्रपती संभाजीनगर
13. नवीन शामलाल बंगारकर, वय ३०, रा. आलमगीर कॉलनी, छत्रपती संभाजीनगर
14. सय्यद नविद अली, वय ५१, रा. रोशन गेट, छत्रपती संभाजीनगर
15. विजय भगवान सुपेकर, वय ३८, रा. चेलीपुरा, छत्रपती संभाजीनगर
16. शेख गुलाब शेख हमीद, वय ५०, रा. खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर
17. शेख राज मोहम्मद, वय ४४, रा. चित्तेगाव, ता.जि. छत्रपती संभाजीनगर
18. समीर रहीम शेख, वय ३३, रा. रहमानिया कॉलनी, छत्रपती संभाजीनगर
19. सदानंद वालय्या चप्पला, वय ६०, रा. नवापुरा, छत्रपती संभाजीनगर
20. सलीम गुलाम खान, वय ४५, रा. मिटमिटा, छत्रपती संभाजीनगर
21. गुलशेर पुरन खान, वय २७, रा. सावंगी, छत्रपती संभाजीनगर
22. रियाज मुसा शेख, वय ३६, रा. रेणुका माता मंदिर, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर
23. राजेश विरकिसन दत्तात्रय, वय ५४, रा. बेगमपुरा, छत्रपती संभाजीनगर
24. विशाल कृष्णा जाधव, वय ३६, रा. मयूर पार्क, छत्रपती संभाजीनगर
या सर्वांविरुद्ध फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४३३/२०२५ अंतर्गत महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात जुगाराचा अड्डा चालत असताना ही गोपनीय माहिती अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांना मिळाली, परंतु स्थानिक पोलिसांना याची कोणतीही कुणकुण लागली नाही, ही आश्चर्याची बाब आहे. यामुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा धंदा स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने चालत होता की त्यांना कारवाई करण्याची हिंमत नव्हती, हा संशोधनाचा विषय आहे. तसेच, या जुगार अड्ड्यामागे कोणत्याही राजकीय नेत्याचा हात आहे का, याबाबतही शंका उपस्थित होत आहे.
पुनम हॉटेल हे माजी नगरसेवक बामणे यांच्याशी संबंधित असल्याचे समजते. मात्र, ज्या पत्र्याच्या खोलीत हा जुगार चालत होता, त्या खोलीचा मालक कोण आहे, याबाबत पोलिसांनी जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये कोणतीही माहिती नाही. या मालकाला पोलिसांनी आरोपी केले आहे की नाही, हेही अस्पष्ट आहे. तसेच, हा जुगार अड्डा नेमका कोण चालवत होता, याबाबत प्रेस नोट गप्प आहे. यासंदर्भात फुलंब्री पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तिथून कोणतीही माहिती मिळाली नाही.