जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हेगारांना मोकळीक? दबंग व नॉन-क्रप्ट निरीक्षक नेमण्याची मागणी

जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हेगारांना मोकळीक? दबंग व नॉन-क्रप्ट निरीक्षक नेमण्याची मागणी

      छत्रपती संभाजीनगर, १५ सप्टेंबर: जिन्सी पोलिस ठाणे हद्दीत दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून अवैध धंद्यांना खुलेआम संरक्षण मिळत असल्याची गंभीर तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. याबाबत लोकशाही पत्रकार संघ, महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष नझीमोद्दीन काझी यांनी पोलिस आयुक्तांना निवेदन देऊन ठाण्यात जेष्ठ, दबंग आणि प्रामाणिक पोलिस निरीक्षक नेमण्याची मागणी केली आहे.

       निवेदनात म्हटले आहे की, गुन्हे शाखा व अमली पदार्थ विरोधी पथकाने जिन्सी हद्दीत वारंवार छापे मारून गावठी कट्टे, नारकोटिक  ड्रग्ज, गांजा विक्री, अवैध गॅस रिफिलिंग, हातभट्टी यासारख्या अनेक बेकायदेशीर गोष्टी उघडकीस आणल्या आहेत. यावरून हे स्पष्ट होते की ठाण्याला अवैध धंद्यांची माहिती असतानाही स्थानिक पोलिस निरीक्षक एकतर निष्क्रिय आहे, किंवा हेतुपुरस्सर त्याकडे दुर्लक्ष करत आहे. दुसरे असे की पोलीस स्टेशन चा एरिया मुस्लिम बहुल असल्याने हेतुपुरस्सर मुस्लिम युवकांना नशेचे आधीन करून बरबाद करण्याचा अजेंडा राबवला जात आहे का? असे प्रश्न निर्माण होतात.

      पोलिस ठाण्याचे हद्दीत घडलेले  गुन्हे उघडकीस आणणे, गुन्ह्यांना प्रतिबंध करणे  आणि कायदा व सुव्यवस्था  अबाधित ठेवणे हे इन्चार्ज पोलीस निरीक्षकांचे आद्य कर्तव्य आहे. ज्या अर्थी गुन्हे शाखा आणि अमली पदार्थ विरोधी शाखा यांचे हद्दीतील अवैध धंदे उघडकीस आणतात त्याअर्थी जिन्सी ठाण्यातील अधिकारी कोणत्या कामात व्यस्त असतात? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

      त्यामुळे, जिन्सी ठाण्यात तातडीने अनुभवी, प्रामाणिक व नॉन-क्रप्ट पोलिस निरीक्षक नेमून गुन्हेगारीवर आळा घालावा, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.