वक्फ बोर्ड ऍक्शन मोड वर : कायदेशीर वागा नसता प्रशासक..!

वक्फ बोर्ड ऍक्शन मोड वर : कायदेशीर वागा नसता प्रशासक..!

औरंगाबाद, ६ डिसेंबर : राज्यातील वक्फ मालमत्तांचा सदुपयोग व्हावा, बोर्डाचे उत्पन्न वाढावे, बोर्डा मार्फत लोककल्याणकारी काम व्हावे, व संस्थांच्या माध्यमातून पारदर्शक कामकाज व्हावे, या उद्देशाने वक्फ बोर्डा कडून अनेक धडाकेबाज निर्णय घेण्यात येत आहे. गेल्या पाच महिन्यात तब्बल दोन हजार लोकांविरुद्ध फौजदारी नोटिसा बजावण्यात आल्या आहे. संस्थांच्या कामकाजात अनागोंदीपणा आढळून आल्यास थेट प्रशासक नेमण्यात येईल, मालमत्तांचा विकास व कायदेशीर अमलबजावणी साठी आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था नेमण्यात येणार असल्याची माहिती बोर्डाचे मुख्यकार्यकारी अधिकारी मोईन ताशीलदार यांनी दिली.

ऑनलाईन सुनावणी सुरू करण्यात आली
      वक्फ बोर्ड मुख्यकार्यालाय, पाणचक्की येथे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी सर्व विभागांची आढावा बैठक घेतली, त्या नंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी अनौपचारिक संवाद साधला. मुंबई येथे सुरू करण्यात आलेले कार्यालय हे फक्त प्रादेशिक कार्यालय आहे, मुख्य कार्यालय औरंगाबादेतच असणार, असे सांगितले. मुंबई कार्यालयातून दररोज दुपारी ०४-३० ते ०६-३० दरम्यान सुनावणी सुरू करण्यात आली आहे. या पुढे राज्यातील सर्व जिल्हा कार्यालयांनाही ऑनलाईन सुनावणीसाठी जोडण्यात येणार आहे. त्या साठी सक्षम इंटरनेट सेवा घेण्या बाबत आम्ही प्रयत्नहीशील आहोत. महिन्या भरात ही प्रक्रिया सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.

ऑनलाइन नोंदणी सक्षम करणार
     वक्फ बोर्डाकडून नवीन संस्थांच्या नोंदणीसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यात ओटीपी व इतर तांत्रिक समस्या मार्गी लावण्यास आदेशीत करण्यात आले आहे. हा प्रश्न आयटीच्या सक्षम लोकांना जबाबदारी देण्यात आली आहे. संबंधितांना लवकरच दिलासा मिळेल, अशी गवाही मुख्यकार्यकारी अधिकारी ताशीलदारांनी दिली.

संस्थांचा पारदर्शक कामकाज अमलबवणी
       बोर्डाकडून पारदर्शक, कायद्यान्वये भाडेतत्वाची अमलबजावणी व्हावी, संस्थांनी पारदर्शक कामकाज करावा व स्वतःहून वार्षिक अहवाल सादर करावा यासाठी तब्बल तेरा हजार संस्थांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या, पैकी आठशे संस्थांचे अहवाल स्वीकारण्यात आले आहे. संस्थांची वर्गवारी विभागणी करण्यात आली असून पहिल्या श्रेणीतून प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या पाच ते दहा अश्या सत्तर संस्थांची सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांना विशेष नोटिसा बजावून चार आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ज्या संस्था किंवा मुतवल्ली सहकार्य करणार नाही, त्यांना कायदेशीर नोटिसा बजावून वेळ पडल्यास थेट प्रशासक नेमण्याची कारवाई करण्यात येणार आहे. यात सोलापूरच्या चिराग अली कब्रस्तान व परभणीच्या कुर्बानशाह अली दर्ग्यावर बोर्डाकडून प्रशासक नेमण्यात आले आहे. भविष्यात कायद्यानुसार कामकाज करण्यासाठी मुतवल्लींना ही प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न  राहणार आहे.

समाजोपयोगी काम करण्याचा मानस
     वक्फबोर्डा कडून गोरगरीब व गरजू लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्याचा उद्देशच आहे. त्या करिता भविष्यात उत्पन्न वाढविण्याचाही उद्देश आहे. मुस्लिम विद्यार्थ्यांना  शिक्षण व आरोग्य संबंधी मदत करण्याचा मानस आहे. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.