आगामी सर्व निवडणुका EVM ऐवजी बैलेट पेपर वर घेण्यात याव्या या मागणीसाठी संविधान विश्लेषक अनंत भवरे यांचे उद्यापासून आमरण उपोषण
औरंगाबाद, २७ नोव्हेंबर : देशातील सर्व निवडनुका EVM, VVPAT सोबत न घेता बैलेट पेपर वरच घेण्यात याव्यात. या मागणीसाठी औरंगाबाद येथील संविधान विश्लेषक अनंत केरबाजी भवरे यांनी निवडणूक आयोगाकडे आणि संबंधितांकडे अनेक निवेदने केली. परंतु त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. म्हणून त्यांनी टोकाचे पाऊल उचलत उद्या मंगळवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२३ पासून औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अन्न त्याग करून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला. गांधी भावनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
याप्रसंगी संविधान विश्लेषक अनंत केरबाजी भवरे यांचेसह त्यांचे सहकारी प्राध्यापक डॉ. मच्छिंद्र गोर्डे आणि संजय निंबाळकर यांची उपस्थिती होती.
संविधान विश्लेषक अनंत केरबाजी भवरे यांनी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्तांकडे पाठवलेले मागणी पत्र खालील प्रमाणे;