रस्त्यावरील राडारोडा महानगरपालिका उचलणार : टाकणाऱ्यांना भरावा लागणार दंड
शहरातील रस्त्यांवर, रस्त्याचे कडेला किंवा मोकळ्या जागेवर पडलेले बांधकाम साहित्यामुळे पादचाऱ्यांना तसेच वाहनांना अडथळा निर्माण होतो व अपघात होऊन दुखापत व जीवितहानी सुद्धा होत असते. अशा स्थितीत बांधकाम साहित्य रस्त्यावर धोकादायक रित्या टाकणे हे फौजदारी गुन्हा पण आहे. असे साहित्य टाकणाऱ्यांचे विरुद्ध पोलिसांनी आणि महानगरपालिकेनी स्वतःहून दखल घेणे अपेक्षित आहे.
औरंगाबाद शहरातील रस्त्यावर, मोकळ्या जागांवर पडलेले बांधकाम साहित्य उचलण्यासाठी महानगर पालिकेची यंत्रणा आता चोवीस तास काम करणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेनी स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक 8551058080 जाहीर केले आहे. नागरिकांना या हेल्पलाइन क्रमांकावर 24 तासात केव्हाही आपली तक्रार देता येऊ शकते. अशाप्रकारे बांधकाम साहित्य उचलण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली असून सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एक पथक काम करणार असून सायंकाळी सहा वाजेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत दुसरा पथक काम करणार.
ज्याने बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकले आहे त्याच्याकडून बांधकाम साहित्य उचलण्याचा खर्च महानगरपालिका वसूल करणार आहे.
औरंगाबाद महानगरपालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडे यांनी काही दिवसांपूर्वी शहराच्या विविध भागात फिरून पाहणी केली तेव्हा रस्त्यावर, रस्त्याचे बाजूला, मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणावर बांधकाम साहित्य, विनाशक कचरा पडलेला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण होते. धूरमुक्त औरंगाबाद शहरासाठी प्रशासक आस्तिककुमार पांडे यांनी असे साहित्य उचलण्यासाठी महानगरपालिकेचे यांत्रिकी विभागाला आदेश दिले. त्यासाठी स्वतंत्र कंट्रोल रूम सुद्धा सुरु करण्यात आला आहे. त्याचा हेल्पलाइन नंबर 8551058080 असा आहे.