महानगरपालिकेकडून मालमत्ता करात बंपर सूट : नागरिकांनी संधीचा लाभ घ्यावा
औरंगाबाद , १२ एप्रिल : चालू वर्षी म्हणजेच सन 2023 - 2024 या आर्थिक वर्षात औरंगाबाद महानगरपालिकेकडून मालमत्ता कराच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. जे मालमत्ताधारक चालू वर्षाचा खालील महिन्यात मालमत्ता कराचा भरणा करतील त्यांना सामान्य करात पुढील प्रमाणे सूट लागू राहील असे महानगरपालिकेकडून जाहीर प्रगटना द्वारे नागरिकांना कळविण्यात आले असून जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी या संधीचा लाभ घ्यावा म्हणून आवाहन करण्यात आले आहे.
अशी राहणार आहे सूट
१. एप्रिल महिन्यात मालमत्ता कराचा भरणा केल्यास १०% सूट देण्यात येईल
२. मे महिन्यात मालमत्ता कराचा भरणा केल्यास ८% सूट देण्यात येईल.
३. जून महिन्यात मालमत्ता कराचा भरणा केल्यास ६% सूट देण्यात येईल.
४. याशिवाय मालमत्ता धारकांनी ऑनलाइन पद्धतीद्वारे मालमत्ता कराचा भरणा केल्यास त्यांना ५% सूट देण्यात येईल.
५. पाच वर्षाचा आगाऊ म्हणजेच ॲडव्हान्स मालमत्ता कराचा भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकांना दोन वर्षाची सूट देण्यात येईल.
६. तीन वर्षाचा आगाऊ मालमत्ता कर भरणाऱ्या एका वर्षाच्या सामान्य करात ५०% सूट देण्यात येईल.
जून नंतर मालमत्ता कर भरणाऱ्यांना अशी लागू राहील शास्ती
मात्र चालू वर्षाचा कराचा भरणा माहे जून नंतर करणाऱ्या मालमत्ताधारकांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे प्रकरण ८ कराधान नियम 41 अन्वये प्रत्येक महिन्यासाठी कराच्या दोन टक्के इतकी शासकीय म्हणून द्यावी लागेल असेही या जाहीर प्रगटनाद्वारे मालमत्ताधारकांना वार्निंग पण देण्यात आली आहे.