औरंगाबाद शहरात पाईपलाईनसाठी पैशांची मागणी; राजूभाऊ वैद्य यांच्या हस्तक्षेपाने दिलासा

औरंगाबाद शहरात  पाईपलाईनसाठी पैशांची मागणी; राजूभाऊ वैद्य यांच्या हस्तक्षेपाने दिलासा

औरंगाबाद, २७ डिसेंबर: जय भवानी नगरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रयत्नांमुळे नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, या कामादरम्यान कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांनी काही नागरिकांकडून पाईपलाईन कनेक्शनसाठी साडेचार हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार समोर आली आहे.

          यामध्ये कांचन तायडे, फकीरचंद लोंढे, आणि भगवान कोळगे या नागरिकांकडून प्रत्येकी साडेचार हजार रुपये घेतल्याचे समजते. काही नागरिकांकडून अजूनही पैसे मागितले जात होते. ही गोष्ट समजल्यानंतर नागरिकांनी शिवसेना महानगर प्रमुख राजूभाऊ वैद्य यांना संपर्क साधून याबाबत माहिती दिली.

          तक्रारीनंतर आज (27 डिसेंबर 2024) सकाळी 10 वाजता जीवन प्राधिकरणाचे अधिकारी सोनवणे, महेश फड आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यांनी कंत्राटदाराला बोलावून नागरिकांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले. भगवान कोळगे यांचे पैसे त्वरित परत करण्यात आले, तर इतर नागरिकांचे पैसेही लवकरच परत केले जातील असे सांगण्यात आले.

        महानगर प्रमुख राजूभाऊ वैद्य यांनी नागरिकांना दिलासा दिला असून यापुढे अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास थेट त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी नागरिकांच्या हितासाठी तत्काळ कारवाई करून प्रकरण सोडवले आहे.
महानगर प्रमुख राजूभाऊ वैद्य यांचा संपर्क क्रमांक: 9422203355
          "जर कंत्राटदार किंवा त्यांचे कर्मचारी नागरिकांकडून पैसे मागत असल्यास त्वरित संपर्क साधा," असेही त्यांनी सांगितले आहे.