भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्राचे भाड्यात जुलैपासून सातपटीने वाढ
औरंगाबाद, १५ जून (प्रतिनिधी) : औरंगाबाद महानगरपालिका संचालित भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्राचे भाड्यात महानगरपालिकेच्या आज संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करून पाच ते सात पटीने वाढ करण्यात आली आहे.
औरंगाबाद महानगरपालिका संचलित भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधिन केंद्र औरंगाबाद महानगरपालिका संचलित भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधिन केंद्र, मजनुहिल हे सन-2006 पासून महानगरपालिकेच्या वतीने सुरु झालेले आहे. सद्यस्थितीत या सभागृहाचे भाडे दर हे दिवसभरातील प्रत्येक तीन तासासाठी रक्कम रु.1000+ 18% जीएसटी असे एकूण रक्कम रु.1180/- आकारले जाते. सन-2006 पासून सभागृहाच्या भाडे दरात वाढ झालेली नसल्याने या सभागृहाचे सुधारित प्रस्तावीत भाडे हे सोमवार ते शुक्रवार या दिवशी प्रत्येक तीन तासासाठी रक्कम रु. 5000 +18% जीएसटी तसेच शनिवार व रविवार आणि इतर सार्वजनिक सुट्टीच्या दिवरशी प्रत्येकी तीन तासासाठी रक्कम रु.7000+ 18% जीएसटी याप्रमाण भाडे दर दिनांक o1/07/2023 पासुन आकारण्यास औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.