औरंगाबाद शहरात ड्रोन उड्डाणांवर बंदी

औरंगाबाद शहरात ड्रोन उड्डाणांवर बंदी

औरंगाबाद, २७ डिसेंबर:  औरंगाबाद शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी ड्रोन व तत्सम उड्डाणांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. ही बंदी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 नुसार लागू करण्यात आली आहे.

           या आदेशानुसार, ड्रोन, मायक्रोलाईट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, हॅण्ड ग्लायडर, हॉट एअर बलून यांसारख्या उपकरणांच्या उड्डाणांवर मनाई करण्यात आली आहे. ही बंदी 31 डिसेंबर 2024 पासून 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत लागू राहील.

           मात्र, पोलिसांकडून हवाई पाळत ठेवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उड्डाणांना किंवा पोलीस आयुक्तांची लेखी परवानगी असलेल्या कारवायांना यामधून सूट देण्यात आली आहे.

          या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 223 नुसार कठोर कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.