शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका – संघर्ष शेतकरी संघटनेची बैठक संपन्न

कन्नड, (प्रतिनिधी) : कन्नड तालुक्यातील नादरपूर येथे संघर्ष शेतकरी संघटना, महाराष्ट्रची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान संस्थापक अध्यक्ष मा. पंढरीनाथ गोडसे पाटील यांनी भूषवले.
बैठकीत शेतकऱ्यांच्या सध्याच्या अडचणी, शासनाच्या धोरणांचा परिणाम आणि संघटनेच्या आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतमालाला हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न सोडवावा यासह शेतकऱ्यांच्या हक्कासाठी निस्वार्थी लढा उभारण्याचे ठरले.
या बैठकीला मराठवाडा अध्यक्ष बाळासाहेब भूमे, मराठवाडा सचिव नरहरी गोरे, जिल्हा उपाध्यक्ष शुभम देशमुख व रामेश्वर मोरे, आरोग्य प्रमुख रवींद्र कीर्तिशाही, सिल्लोड तालुकाध्यक्ष युवराज मोरे, रत्नपूर तालुका संपर्कप्रमुख सुनील आहेवाड, आमठाणा सर्कल प्रमुख रुपेश चौधरी, आनंद भाऊ देशमुख, कन्नड युवक तालुकाध्यक्ष दिलीप गायकवाड, सुरेश निकम आणि दिलीप निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस मते मांडली आणि संघटनेच्या माध्यमातून एकसंघपणे लढा देण्याचे आवाहन केले.
यावेळी कन्नड तालुक्यातील विविध पदांवर नवीन नियुक्त्या करण्यात आल्या. अध्यक्ष मा. पंढरीनाथ गोडसे पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देऊन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली.
या बैठकीत घेतलेल्या निर्णयांमुळे संघटनेच्या कार्याला नवी ऊर्जा व दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.