P.O.L.I.C.E. : भिंतीवरचं चित्र, जमिनीवर शून्य

न्हाय मुळीच न्हाय ह्यो कुण्या सिनुमाचं नाव बीच नाय तर ह्यो आपल्या मायबाप सायब लोकांच्या सायबी परतापाला अन तोऱ्याला आमचा चमत्कारी नमस्कार हाय!
मी भारत उत्तम कागदी, साधा-सरळ व अडाणी माणूस अन त्यातल्या त्यात एका खेड्यात (हवं तर बाडीत म्हणा) राहणारा. वयाची पन्नाशी गाठली तरीवी कधी कुण्या फांदात नाही की लफड्यात नाही, आणि असावं तरी का म्हून? एवढं मात्र १६ आणे खरं की आपल्या १० संकटांपैकी एखाद-दुसरंच नैसर्गिक तर उरलेली आमंत्रित अवधान असत्यात. रानातल्या पिकानंच आतापातुर घराला आविष्याला आधार दिला म्हून जीव लावला, त्यातच जीवाचं रान झालेलं. अन् मधीच एखादं दुखणं किंवा ५० एक रूपायचं खर्च आला की गबाळ गुंडाळण्याचचं काम की हो!
तसं तर परत्येकाच्या आविष्यात तरास अन दुःख्खाचा शिमगा कायमचाच असतोया, तरी वी आपण गरीव म्हून चालवायचं झ्याक म्हणतच टुकू-टुकू ! माझं नशीब फुटकं म्हणायचं का काय? समदं एकदम झ्याक चाललं असताना अचानकच रानातून माझी महस (म्हैस हो) हरवली. सायंकाळ पावेतो साऱ्या वाडीत कोहीनूर हिरा हरविल्यागत माझ्या म्हशीला शोधलं, पण कुणालाच ती गावली नाही. साऱ्या जाणकारांनी सांगितलं बाबा रे, आपल्या वाडीत तर पोलिस पाटील वी न्हाय अन पोलिस चौकी बी। तर मग जिल्ह्याचं मुख्यालय असलेलं शहर जवळचं म्हणजी ८-१० कोसावर हाय. शहरातल्या पोलिस चौकीत जाऊन तक्रार दे म्हणजी पोलिसवालं सायद म्हशीचा शोधण्यात आपली मदत करतील. हे ऐकून थोडा धीर आल्यागत वाटलं खरं पण शहर, पोलिस चौकी आणि ते समदं माझ्यासाठी नवंच होतं-त्याची कल्पना डोळ्यासमोरून गरगरा फिरू लागली आणि कवा एकदाचा शहरातल्या पोलिस चौकीत पोहचून तक्रार देतो अन् माझी म्हस परत मिळवितो असं झालं होतं.
दुसऱ्या दिवशी सकाळपावेतो मला चैन पडणार नव्हतंच म्हून म्या तडक शहर गाठायचं
ठरीवलं, म्या अन् सत्य (माझा मोठा मुलगा) शहराकडं निघालो. बैलगाडीतून कसंबसं शहर गाठलं, शहरात आल्यावर पोलिस चौकीचा शोध घेण्यात येण्याचा पर्वासापेक्षा जास्त वेळ गेला. शहरातल्या सायवांना गावंढळ बापलेकांसोबत गंमत करायची लहर आली आणि त्यांनी आम्हासनीच खेळ बनवून ती हौस भागविली. त्यात एक पोलिसवालं सायद वी होतं, त्याने सगळी माहिती इचारली, तंबाखू खाल्ली आणि काही न सांगतीच निघूनही गेला. खरं म्हणजी तेची दरडावून प्रश्न इचारायची पद्धत बघून भ्या बाटलं आणि एकदा तर असंही वाटलं जणू म्याच माझी म्हस लपवून यासनी तरास द्यायला आलो की काय? तरी उरलेल्या लोकांसमोर हात जोडून, विनवण्या करून व स्वतःची अडचण पटवून देत आम्ही पोलिस चौकीचा पत्ता घेऊन पोलिस चौकी गाठली-एकदाची!
खरं सांगावं तर मला लईच विचित्र वाटतं होतं हे शहर अन् हे समदं वातावराग्वी, तरी....! पोलिस चौकीच्या दारापासून थोड्या अंतरावर आडोश्याला बैलगाडी लावली अन् बैलांना झाडाला बांधून वैरण-पाणी दिलं. सायब लोकांची किरपा व्हावी अन् हरवलेली म्हस गावली की झालं या विचारानं आणि नव्या वातावरणाच्या धाकधुकीतच पोलिस चौकीत पाय टाकला ! सत्य ने सांगितलं की तात्या यास पोलिस स्टेसन म्हणत्याती. खरचं की या वाड्यापरमाणं असलेल्या इमारतीत गाड्या, लोकं अन् खाकी पोशाखतलं सायवांची फौज लईच न्यारी भासत व्हती. हे समदं याचि देहि याचि डोळा पाहून म्या तर गुंगच झालो अन् आता तर म्हस नक्कीच गावल या इश्वासानं बिगी बिगी चालाया लागलो. तोच गावच्या पाटलावनी झुपकेदार मिश्या असणात्या पोलिसवाल्या सायवानं मला अन् माझ्या पोराला कुठे जातोयर्स असे खडसावून इचारलं. म्या तर पुरता घाबरलोच पण मुलानं हात धरून धीर देत त्या सायबांस घडलेली इपदा सांगितली. सायब जोरात हसला अन् म्हणाला चोर, दरोडेखोर, दहशवादी, गुन्हेगार, पुढारी, नेता, मंत्री आदींच्या मागं धावण्यात आविष्य गेलं अन् आता गाय-म्हस व जनावरांच्या मागं वी आमीच पळायचं का? (म्या मनातच इचार केला की चौकीतली बहुतेक पोलिसवालं सायब हे अगदीच फुगलेलं हायेत, हे सबतासाठीच धावू शकत न्हाईत तर तुमच्या-आमच्यासाठी काय धावतील?)
काळानं तर आमची थट्टा वी उडविली अन् समदी गुर्मी बी जिरविली पण जर का माय-बाप सायब लोकबी आमची टिंगलटवाळी करू लागले तर आमी जायाचं तरी कुठं? सायबाच्या त्या बोलण्याचा म्या राग येऊ दिला नाही. तसं वी राग आला असता तरी म्या काय केलं असतं? काईच न्हाय, कारण सायबाच्या कमरेला कमरपट्टा तर हातात भला मोठा सोटा होता! काही येळ असाच गेल्यावर त्या सायबांनी समोरच्या खोलीत खुर्चीवर वसलेल्या सायवाकडं बोट दाखनिल धामामनी म्या तर पुरता गांगरलोच पण करणार तरी काय, शेवटी एक साधारण अन् गरिब यक्तीच ना मी? यापेक्षा येगळे ते काय घडणारं, कधी छोटे तर कधी मोठे-कधी अमूक तर कधी तमूक सायवांना भेटून, त्यांचे उंबरठे झिजवून पार वैतागलो, त्यावर कहर म्हणजी एकामागं एक असे शेकडो प्रश्न विचारून परतेकाने आपली हौस अन् दादागिरी भागवली. काय पाप केलं अन् चौकीत आलो अस म्हणत सौताच्याच थोवाडीत मारून घेतली. तिकडे जा अन् बोंबल असं सांगितलं. आविष्यात पहिल्यांदीच असं बोलणं अन् 10/16 सायंकाळी घरनं निघालो अन् आता पार रात्र झाली, पोटात भाकर न्हाय, ज्या कामापायी येवढी मरमर केली त्याच्या नेम न्हाय आणि त्यात आमा रयतेच्या सेवकांचं आमांवर थोर उपकार पाहून तर अक्षरशः धाय मोकलून रडावसं वाटलं, पण ते वी जमण्यासारखं न्हाय आपल्याला, राग मानायचं काम न्हाय कारण आमी गरिब असलो तरी स्वाभिमान व घरंदाजपणा इकला नाही आतापतुर तरी, बराबर हाय नव्हें.....?
म्हस कशी होती, त्याचा रंग कोणता (?), किंमत काय होती, कशी हरविली, कुठे हरविली, कुणावर संशय हाय का? हे रडगाणं एक पहर चालल्यागत वाटतं अन् या अश्या कावकावनं तक्रार न देणंच चांगल असं वारंवार वाटत होतं.
रात्रपाळीच्या सायबांनीही तोच कित्ता गिरवीत डोचकं फुटायची येळ आणली तरी आमी संयम अन् लाचारीखातर खितपत पडलो होतो. कितीतरी येळेनंतर येका कोऱ्या कागदावर तक्रार लिहून घेतली. मंग सायबांनी आमाला चहा-पाण्याबद्दल इचारलं ! फार येळेपासून चाललेलं समद्या डोकेदुखीत सायबांनी इचारल्याचं समाधान चेहऱ्यावर येतो न येतो तोच सायवांच्या डाव्या बाजूस बसलेल्या दुसऱ्या सायबानं या इचारपूसचं वास्तव सांगितलं. ते असं की चहापाणी आमच्यासाठी नसून सायब म्हस शोधण्यासाठी कष्ट करणारं आणि त्यासाठी त्यांना काहीतरी दाम द्यावं लागतीलचं. सरकारी कामात अशी शिरजोरी पाहून खरचं फार खंत वाटली. सायब लोकांचा तोरा बोलण्याची पद्धत अन् वाकी राजेशाही थाट पाहून आढेवेढे न घेता स्वतःला कोसतच सायबांनी मागितलेली फी सायबांच्या हाती देऊन घराकडं निघालो. म्या तर याचा येक लहानसा शिकार हाय, पण रोज या दलदलीत किती आविष्य संपत असतील? म्या जेवढा येळ या सरकारी दुकानात राहिलो तेवढ्या येळेत अनेक तक्रारी हिशोबानं निकाली काढण्यात आल्या. त्येंचा योग्य निकाल लागणारं का न्हाही यासाठी म्या तरी येळेची वाट पाहणार नाही कारण वयानं मला अनुभव तर येळेनं धडे दिले हाये.
या समद्या परकारास माझा सत्य उघड डोळ्यानी पाहत तर होता पण हे त्येच्याही बुद्धीला न पटणारं होतं. माझा सत्य दोन-चार पुस्तकं शिकलेला, हे समदं पाहून, एकूण वातावरण बारकाईने बघून त्यो वाटेत मला इचारू लागलाकीः सत्यमेव जयते, सदरक्षणाय खलनिग्रहनाय अन् भिंतीवर भलंमोठं तत्वज्ञान चितारून मनमर्जी चालविणे हीच जर लोकशाही आहे, तर त्यापेक्षा त्यो पारतंत्र्याचा काळ या पतुर वंगाळ तर नसलंच असं मला वाटतया! भिंतीवर चितारलेलं असं कायबी कसं खरं मनायचं मंग? टकुऱ्याचा निसता भुगा झालया.
Polite - नम्र
Obedient - आज्ञाधारक
Loyal - राजनिष्ठ
Intelligent - बुद्धिमान
Courageous - शूर
Efficient - कार्यक्षम
पाच-पन्नास रूपयांसाठी लोक अन् ते बी रयतेचं सेवक छोट्या पदाहून ते मोठाल्या पदापर्यंत असलेले बहुत्येक लोकं या थराला जात असतील हे बघून म्या मनातल्या मनात हसलो अन् मला माझी, वाडीची, समद्या देशाची किव करावीशी वाटली.
सत्य बोललाः हेच का भिंतीवर रंगविलेलं P.O.L.I.C.E.? बापू तुम्ही रूपये दिले तरी का? आपण म्हैस हरविल्याची तक्रार द्यायला आलो होतो की एक म्हैस खरेदी करण्यासाठी? लोकांनो अवगुणांची ही अवदशा व हे समदं थोतांड अन् यामागचं अतिस्वार्थापायी चालणारं षडयंत्री कारभार लवकरच थोपीवलं किंवा संपीवलं नाही तर समदंचं राख होईल की....!
टीपः ही कथा सत्य माना अचवा काल्पनिक पण यातून वास्तव आस्तित्वाचा बोध आणि वेध घेण्यास निश्चितच मदत होईल.
- इकबाल सईद काझी (विश्लेषक/लेखक/कवी)