शिंदे सेनेचे अब्दुल सत्तारांसह पाच मंत्र्यांना मिळणार डच्चू : भाजपा हायकमांडचे आदेश;  मुख्यमंत्री अज्ञात वासात.

शिंदे सेनेचे अब्दुल सत्तारांसह पाच मंत्र्यांना मिळणार डच्चू : भाजपा हायकमांडचे आदेश;  मुख्यमंत्री अज्ञात वासात.

मुंबई : भाजपा हायकमांड ने शिंदे सेनेच्या पाच मंत्र्यांचे कामावर नाराजी व्यक्त करीत त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकल्याचे, व त्यांना मंत्रीपदावरून हटविण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांना दिल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची गोची झाली असून ते मागील दोन दिवसापासून नॉटरीचेबल असल्याची बातमी आहे. ज्या पाच मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार आहे त्यात औरंगाबादचे दोन मंत्री अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे यांचा समावेश असून इतर मंत्र्यांमध्ये तानाजी सावंत, गुलाबराव पाटील आणि  संजय राठोड यांचे नावाची चर्चा आहे.

     मिळालेल्या माहितीनुसार या पाचही मंत्र्यांच्या जागी इतर आमदारांना संधी देण्याचे देखील आदेशात म्हटले आहे.

     मागील काही दिवसापासून शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा जोरात सुरू आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या आधी हा मंत्रिमंडळ विस्तार अपेक्षित आहे. यासंदर्भात भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका दिल्लीत झाल्या बाबतची माहिती समोर येत आहे. मंत्रिमंडळाचे विस्तारासोबतच शिंदे सेनेच्या या पाच मंत्र्यांचे कामकाजावर भाजपा हाय कमांड ने नाराजी व्यक्त केली असून त्यांचे जागी इतर आमदारांना संधी द्यावी असे आदेश मुख्यमंत्र्यांना दिल्याची बातमी समोर येत आहे. 

       शिवसेनेत बंडखोरी च्या वेळी ज्या जवळच्या लोकांनी एकनाथ शिंदे यांना सपोर्ट केला होता त्यांनाच बंटी पदावरून कसे हटवायचे? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांच्यासमोर उपस्थित झाल्याने त्यांची गोची झाली आहे. त्यामुळेच की काय ते दोन दिवसापासून नॉट रिचेबल असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काय निर्णय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
       भाजपा हायकमांडचे अशा प्रकारे देण्यात आलेल्या आदेशामुळे एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे.