किराणा दुकानातून चीनी नायलोन मांजाचा काळाबाजार; पोलिसांची धाड, आरोपी फरार

किराणा दुकानातून चीनी नायलोन मांजाचा काळाबाजार; पोलिसांची धाड, आरोपी फरार

यवतमाळ(वसीम शेख) ९ डिसेंबर:- पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांचे आदेशाने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला नायलॉन चायना मांजा विकी करणाऱ्या ईसमावर कारवाई करण्याचे आदेश दिले असता गोपनिय माहीतीगार यांचेकडुन माहीती काढली असता कळंब चौक कुंभारपुरा येथे नायलॉल मांजा व पंतग विकी करणारा मोहम्मद शहेबाज शेख सत्तार अंदाजे वय ४० वर्ष रा. कळंब चौक कुभांरपुरा हा त्याचे शिफा किराणा दुकाणात प्रतिबंधीत नायलॉन मांजा विकी करीत आहे. अशा प्राप्त माहीती प्रमाणे कळंब चौक कुभांरपुरा यवतमाळ येथे पंतग विकी करणाऱ्या शिफा किराणा दुकाण जवळ पोलीस गेले असता पोलीसांना पाहुन शिफा किराणा दुकाण चालक हा पळुन गेला. त्यावेळी स्थानीक पंचाचे मदतीने दुकाणाची झडती घेतली असता दुकाणामध्ये पांढऱ्या रंगाचे पोत्यात MONO KTC आणी MONO KITE असे लेबल असलेले १२ नायलॉन मांजा चे चक्री बंडल एकुण ३६००/-रू. चा नायलॉन मांजा मिळुन आल्याने पंचासमक्ष जप्त करून पंचनामा कारवाई करून सदर आरोपीविरूध्द पो.स्टे. यवतमाळ शहर येथे अप.क.१०३६/२०२५ कलम २२३,२९३ भारतीय न्याय संहिता सहकलम ७,१७ पर्यावरण सरंक्षण अधीनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

        महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये जिल्हा अधिकारी तथा दंडाधिकारी यवतमाळ हयांनी नायलॉन मांज्याची / धाग्याची निर्मीती, विकी व साठवनुक व वापर करण्यास संपुर्ण यवतमाळ जिल्ह्यात कायम स्वरूपी बंदी घालण्यात आलेली असुन पतंग उडवीणे करीता नॉयलॉन मांजा /चायना मांजा विकी करीता ठेवणे गुन्हा असुन त्यामुळे सार्वजणीक मानवी जिवीतास व पशु पक्षी यांचे जिवीतास धोका निर्माण होतो. तसेच सदर नायलॉन मांजा अविघटनशिल असल्याने गुरा ढोरांना उदभवणारा धोका, माती व पाण्याची गुणवत्तेची पातळी घसरून पर्यावरणाची हानी होते व मानवी जिवन धोक्यात येते. त्यामुळे नागरीकांना आवाहन करण्यात येते कि, नायलॉन मांजा यवतमाळ जिल्ह्यात विकी, साठवणुक व निर्मिती विषयी पोलीसांना माहीती देण्यात यावी.

        सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने, पोलीस निरिक्षक रामकृष्ण जाधव, पोस्टे यवतमाळ शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण चे पथक प्रमुख सपोनि मिलीद सरकटे, पोउपनि गणेश सपकाळ, पोहवा / रावसाहेब शेंडे, प्रदिप नाईवाडे, किरण पडघन पोलीस अंमलदार प्रदीप कुरडकर, गौरव ठाकरे, पवन नांदेकर, अभीषेक वानखडे, प्रतिक नेवरे यांनी केली आहे.