"तुम्ही दिसलात की एनर्जी येते", म्हणत मुख्याध्यापिकेचा RSS च्या ज्येष्ठ कार्यकर्त्याने केला विनयभंग

"तुम्ही दिसलात की एनर्जी येते", म्हणत मुख्याध्यापिकेचा RSS च्या ज्येष्ठ कार्यकर्त्याने केला विनयभंग

सातारा (प्रतिनिधी): तुम्ही दिसलात की पॉझिटिव्ह एनर्जी येते, तुम्हाला पॅन्ट शर्ट मध्ये पाहायचे आहे, तुम्ही पांढऱ्या रंगाच्या ऑरेंज कॅपिटल साडी मध्ये छान दिसता, असे म्हणत मुख्याध्यापक महिलेची वारंवार जवळीक साधून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी आरएसएस चा जेष्ठ कार्यकर्ता आणि भाजपाचा पदाधिकारी दत्ताजी थोरात याचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी महिलेने सातारा येथील शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

     शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला मुख्याध्यापिका आहेत. महाविद्यालयात असताना थोरात हा अनेकदा तिथे यायचा आणि महिलेला जबरदस्तीने तुम्ही दिसलात की पॉझिटिव्ह एनर्जी येते, तुम्हाला पॅन्ट शर्ट मध्ये पहायचे आहे, तुम्ही पांढऱ्या रंगाच्या ऑरेंज कॅपिटल साडी मध्ये छान दिसता, तुमचे व्हिडिओ दाखवा, असे म्हणत त्याने महिलेचा विनयभंग केला. महिलेच्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात दत्ताजी थोरात याचे विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. हा आरोपी राष्ट्रीय समाजसेवक संघाचा ज्येष्ठ कार्यकर्ता आणि सातारा जिल्हा भाजपचा पदाधिकारी आहे.  या घटनेमुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.

     महिला मुख्याध्यापिकेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतली आहे. पोलीस आता महाविद्यालयातील काही जणांची चौकशी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आरोपीचाही जबाब घेण्यात येणार आहे. याआधी आरोपीने आणखी कोणाकोणाची छेळ काढली? याचाही पोलीस सखोल तपास करत असल्याचे सांगण्यात आले आहे.