काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना शिक्षा....
सूरत : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना सुरत येथील न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. मानहानी प्रकरणात कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे.
मोदी आडनावावरून टीका केल्याप्रकरणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर लगेचच त्यांना जामीन देखील मंजूर करण्यात आला.
भारतीय दंड संहितेच्या कलम 499 आणि 500 (मानहानी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. राहुल गांधी ऑक्टोबर 2021 मध्ये सुरत कोर्टात त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी हजर झाले. अर्जुन मोढवाडिया यांनी गुरुवारी सांगितले की, सत्याची परीक्षा घेतली जाते आणि त्रास दिला जातो, परंतु सत्याचाच विजय होतो. गांधींवर अनेक खोटे खटले दाखल झाले, पण ते यातून बाहेर येतील. आम्हाला न्याय मिळेल.
हे पण वाचा : महाराष्ट्रातील दोन कॅबिनेट मंत्री गैर कायदेशीर मंडळीत सामील
"सर्व चोरांचे आडनाव मोदी सारखेच का आहे?" असे त्यांनी कथितपणे केलेल्या वक्तव्यावर राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी निकाल सुनावण्यात आला तेव्हा काँग्रेस खासदार राहुल गांधी सुरत जिल्हा न्यायालयात हजर होते. याआधी ते म्हणाले होते की, त्यांना कोणी जी काही शिक्षा देईल, ती त्यांना मान्य असेल.
राहुल गांधी यांच्या वादग्रस्त विधानाविरोधात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी याचिका दाखल केली होती. वायनाडचे लोकसभा सदस्य राहुल यांनी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी कर्नाटकातील कोलार येथे झालेल्या जाहीर सभेत वरील टिप्पणी केली होती.