काला चबुतरा या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करा: राजेंद्र दाते पाटील यांची मागणी

काला चबुतरा या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करा: राजेंद्र दाते पाटील यांची मागणी

औरंगाबाद:  क्रांती चौकातील ऐतिहासिक काला चबुतरा नष्ट करणाऱ्या आणि ध्वजास नुकसान पोहचवीणाऱ्या व्यक्ती  विरुद्ध तात्काळ गुन्हा नोदंवुन काला चबुतरा या गंभीर प्रकरणाची शासनाने उच्च स्तरिय समिती नेमुन चौकशी करावी अशी महत्वाची मागणी मराठवाडा मुक्ती दिनाचे औचित्य साधुन शहर विकासाचे जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी शासना कडे,उस्मानपुरा पोलीस स्टेशन व पोलीस आयुक्त यांना तक्रार दाखल करून केली होती  परंतु त्यावर अद्याप काही एक कारवाई झालेली नसुन या त्यांचे मागणीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.ही बाब १५ सप्टेंबर २०१९ पूर्वी पासुन त्यांनी प्रशासनाच्या लक्षात आणुन दिली आहे.

आपल्या तक्रारीत त्यांनी पुढे असे  नमुद केले आहे कि,सातत्याने शासनाकडे तथा प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली होती की, क्रांती चौकातील काला चबुत-याचे अस्तित्व मिटवणा-यावर गुन्हे दाखल करा अशी सातत्याने मागणी शहर विकासाचे जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी केलेली आहे. त्यांच्या सदर तक्रार अर्जामध्ये प्रामुख्याने नमुद करण्यात आलेले होते  की,  स्वातंत्र्य इतिहासाची साक्ष असलेला क्रांती चौक जवळील औरंगाबाद मधील  काला चबुतरा या इतिहास कालीन १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामातील स्थळ नष्ट केले असल्या बाबत शासनाने उच्च स्तरिय चौकशी करुन संबधीतावर गुन्हे दाखल करावा अशी मागणी निवेदना द्वारे विभागीय आयुक्ता मार्फत शासनाकडे केली होती परंतु त्यास योग्य असा प्रतिसाद न मिळाल्यामुळे  पोलिसांना देखील तक्रार करण्यात आली होती,स्वातंत्र्याच्या इतिहासाची साक्ष असलेला औरंगाबाद क्रांती चौक जवळील " काला चबुतरा " या इतिहास कालीन १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामातील स्थळ हे काही व्यक्तींनी दुष्ट हेतुने इतिहास नष्ट करण्याकामी नष्ट-उध्वस्त-जमीन दोस्त केलेला आहे. असे हे ऐतिहासिक स्थळ शोधने अत्यंत आवश्यक असुन स्वातंत्र्य लढ्यातील हा आमचा मानबिंदु असलेला ठेवा असुन या बाबत स्वातंत्र्य इतिहासाची साक्ष असलेला काला चबुतरा कुठे आहे ?या  इतिहासाची साक्ष असणाऱ्या वास्तु असल्यामुळे औरंगाबाद मनपा क्षेत्रातील काला चबुतरा हा ध्वज स्तंभ आपल्या  जागेवर दिसत नसुन मनपा प्रशासन औरंगाबाद यांना काला चबुतऱ्याचा शोध घ्यावा अशी मागणी करुन सुध्दा यावर काही एक कारवाई झालेली नाही. काला चबुतरा हे ऐतिहासिक स्थळ मनपा हद्दीत आहे ते आता आपल्या जागेवर कुठेही दिसत नाही. ऐवढा मोठा व गंभीर विषय असा अचानक पणे मनपा प्रशासनास  नजरेआड करता येणार नाही किवां सोडून  देता येणार नाही म्हणुन सदरची तक्रार पोलिसांना सुध्दा  देण्यात आली असल्याचे प्रतिपादन शहर विकासाचे जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी केले होते.  
 सन १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यातील  स्वातंत्र्य सैनिकांना  फाशी  दिलेल्या स्थळास काला चबुतरा हे नाव दिलेले होते व ती वास्तुच सध्या  गायब असल्याचे स्पष्टपणे लक्षात येत असुन अचानक काला चबुतरा हि वास्तु हरवली ? कि गहाळ झाली ?- कि नष्ट करण्यात आली ? याचा बोध होत नसल्यामुळे सदरची तक्रार उस्मानपुरा  पोलीसा कडे देण्यात आलेली होती. मागील काही महिन्यापुर्वी ज्या ठीकाणी ध्वजस्तंभ उभारणी कार्यक्रम संपन्न झाला होता त्या कार्यक्रमाचे संयोजक म्हणत होते  कि, ज्या जागेवर फाशी तथा  मृत्यूदंड देण्यात येत असे ती स्मारकाची जागा नव्याने तयार केलेल्या ध्वजस्तंभ तथा स्मारकाच्या बाजूला आहे हे जर खरे मानले तर मग ती काला चबुतरा ही वास्तु  नक्की कुठे आहे ? हे सुध्दास्पष्ट होत नसुन ती वास्तुच कुठेही दिसत नाही
      तत्कालीन १८५७ च्या काळात  औरंगाबाद च्या२४ स्वातंत्र् सेनानीना फाशी दिल्या गेली होती या मध्ये विशेषतः  मिर फिदा अली, मोदी खान,शेख रहीम,जाबाज खान, महोम्म्द मिर्झाखान, शेख फत्ते  महोम्म्द,महोम्म्द सालेर,दिलावरखान, शेख हुसैन, मिर्झा अजीम बैग, हुसेनखान, शेख मलिक अहेमद खान, मीर मजहर, अली खान, नूरखान,मीर इनाम अली, अब्दुल्ला खान, महोम्म्द मीर खान,मीर बदर अली,फैझ महोम्म्द आदींचा समावेश असल्याचे अभ्यासु बाब शहर विकासाचे जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी खुप पुर्वीच उजेडात आणली होती व त्या अनुषंगाने अशा या महान आणि ऐतिहासीक वास्तुला हेतु पुर्वक जाणुन बुजुन दुष्ट हेतुने समाजा मध्ये तेढ निर्माण करण्यासाठी नष्ट करण्यात आले असुन काला चबुतरा असा  अचानक मिटवण्याचा अधिकार ना महानगर पालीका प्रशासन औरंगाबाद यांना आहे ना कुठल्याही व्यक्ती किंवा संस्थेला आहे.
ही अत्यंत दुर्देवी बाब असल्याने आमचा हा तो ऐतिहासिक ठेवा आता मनपा प्रशासनाने कुठे आहे ते दाखवला पाहीजे अथवा तो चबुतरा नष्ट झाला कि हरवला आहे कि गहाळ  झाला आहे याचा शोध घेणे आवश्यक असल्यामुळे या बाबत ही  रितसर तक्रार पोलीसा कडे देण्यात आलेली आहे. या गंभीर बाबीवर प्रशासन काही कारवाई करत नसल्यामुळे या ऐतिहासिक वास्तुला नष्ट करणाऱ्या सर्वांवर व दोषीवर गुन्हे दाखल करून इतिहास व ऐतिहासिक वास्तु जतन कराव्यात अशी मागणी सुद्धा शहर विकासाचे जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी केलेली असुन सदर बाबी हया भारता मध्ये आणि राज्यात अस्तित्वात असलेल्या पुराण वस्तु कायदा म्हणजेच हेरीटेज कायद्यामधील विविध तरतुदींचा भंग करणारा आहे. त्याच प्रमाणे " दि  प्रिव्हेंशन ऑफ इनसल्ट टु नॅशनल ऑनर अ‍ॅक्ट १९७१ " याचा उल्लंघन करणारा बाबींचा समावेश सदर काला चबुतरा नष्ट करणे प्रकरणा मध्ये झालेला आहे. आणि एन्शीयंट मौन्युमेंन्टस अ‍ॅण्ड आर्कोलॉजिकल साईट्स अ‍ॅण्ड रिमेन अ‍ॅक्ट २०१० त्याचप्रमाणे राज्य आणि राष्ट्रीय स्तरीय हेरीटेज अ‍ॅक्ट चे स्पष्ट पणे उल्लंघन असल्याचे मत शहर विकासाचे जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी व्यक्त केलेले आहे. 
त्याच प्रमाणे  क्रांतीचौक येथे उभारण्यात आलेल्या भव्य ध्वज स्तंभावर असलेला राष्ट्रीय तिरंगा ध्वज सोसाटयाच्या वाऱ्यामुळे ५ महिन्यांत ४ वेळा फाटला असल्याचे  वृत्तपत्रा मध्ये आलेल्या बातमीवरुन स्पष्ट होत असुन हि बाब राष्ट्र ध्वजाचा अवमान करणारी असुन फ्लॅग कोड म्हणजेच ध्वज आचार सहिंता मध्ये नमुद विविध कलमांचा हा भंग असुन राष्ट्रप्रेमी नागरीकांच्या भावनांचा व सन्मानाचा हा अनादर तथा अवमान आहे. शहरवासीयांच्या मनामनात राष्ट्रप्रेमाची भावना चेतवणारा महाकाय तिरंगा हवेचा मारा न सहन झाल्याने फाटला असल्याचे विविध वृत्त पत्रामध्ये आलेल्या बातम्यामधुन स्पष्ट होत असल्याचे प्रतिपादन शहर विकासाचे जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी पूर्वीच केलेले आहे. 
      तिरंगा ध्वज खांबावर आदळुन फाटला होता ही बाब  वृत्तपत्रामध्ये नमुद करण्यात आला असुन सदर बाब सुध्दा ध्वज आचार सहितेची भंग करणारी  आहे असे असल्याचे प्रतिपादन शहर विकासाचे जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी केले आहे .क्रांती चौकातील झांशीच्या राणी उद्यानातील ऐतिहासिक काला चबुतऱ्या जवळ ४ नोव्हेंबर २०१७ रोजी शहरातील सर्वांत उंच राष्ट्रध्वज बसवण्यात आला होता. एका समारंभा मध्ये या तिरंगा ध्वजाचे लोकापर्ण झाले असल्याचे नमुद करण्यात आले होते आणि सदरचा ध्वज हा पॉलिस्टर कॉटनचा  तिरंगा २२७ फुटी खांबावर असुन  राष्ट्रध्वजाचा आकार ३६ बाय ५४ फुटांचा असल्याचे नमुद करण्यात आले असुन उपलब्ध ध्वज आचार सहिता कायद्यातील विविध कलमांचा भंग होत असुन सदर बाब सुध्दा राष्ट्र ध्वजाचा अवमान करणारी असल्या मुळे विविध कलम प्रमाणे ध्वज कोड व ध्वज आचारसहींते नुसार कायदेशीर कारवाई करुन शहरवासीयानां न्याय दयावा आणि वरील प्रमाणे नमुद केलेल्या तक्रार अर्जाप्रमाणे ऐतिहासीक वास्तु जाणुन बुजुन नष्ट करणे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे आणि राष्ट्र ध्वजाचा अवमान करुन ध्वज आचार सहिता मध्ये नमुद विविधबाबींचा भंग करणे  आणि राज्य  आणि राष्ट्रीयस्तरावर असलेल्या हेरीटेज म्हणजे पुराण वस्तु जतन कायदाचा भंग करुन लोक भावना दुखविणाऱ्या सर्व संबंधीत व्यक्तीवर तात्काळप्रचलित  कायद्या प्रमाणे गुन्हा नोंदवावा अश नम्र विनंकरण्यात आली होती परंतु अद्यापही या वर कारवाई झालेली नसल्याचे प्रतिपादन शहर विकासाचे जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी केले.आमच्या प्रतिनिधी शी बोलतांना राजेंद्र दाते पाटील म्हणाले की, त्यांनी  स्वतः असा तक्रार अर्ज उस्मानपुरा पोलीस ठाणे औरंगाबाद  येथे दिलेला असुन अद्याप काही एक कारवाई प्रशासनाने केलेली नाही हे विशेष आहे म्हणु आता १७ सप्टेंबर  २०१९ रोजी  मुख्यमंत्री शहरात येत आहेत त्या पुर्वी काही कारवाई होणार आहे काय असा महत्वपुर्ण सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.