शिवशाही बसची कंटेनरला धडक : तेरा प्रवासी जखमी
औरंगाबाद : शहरातील सेंट्रल बस स्टॅन्ड वरून नाशिकला निघालेली शिवशाही बस बाबा पेट्रोल पंप चौकात येतात रस्ता ओलांडताना बस वरील कंट्रोल सुटल्याने नेमके त्याच वेळी तिथून जाणाऱ्या एका कंटेनरला बसने धडक दिली. यात बसमधील तेरा प्रवासी जखमी झाले असून अपघातात बसचा समोरील भाग अक्षरशः चक्काचूर झाला. ही घटना 14 एप्रिल रोजी पहाटे पावणे पाच वाजे दरम्यान घडली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही.
या अपघाताची माहिती मिळताच क्रांती चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार नाशिक डेपो ची शिवशाही बस (MH09, EM 1297) शुक्रवारी पहाटेच्या सुमारास नाशिकला जाण्यासाठी सेंट्रल बस स्टॅन्ड वरून निघाली होती. बाबा पेट्रोल पंप चौकात ही बस आल्यावर सिग्नल ओलांडताच चिखलठाणाच्या दिशेने आलेल्या कंटेनरचा ((MH 40, CM 0613) वेग पाहून शिवशाही बसचे ड्रायव्हरचे बस वरील कंट्रोल सुटले. आणि बसची कंटेनरच्या पाठीमागील भागाला जोराची धडक बसली.
घटनेची माहिती मिळताच क्रांती चौक पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर होळकर, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर राजकुमार पुजारी यांनी तात्काळ सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले.
जखमींची नावे अशी...
मीरा अशोक शिंदे वय 57 राहणार नाशिक, निर्मला मधुकर दिघे वय 55 राहणार नाशिक, पांडुरंग गाडेकर, बेबी बाबासाहेब बरबडे वय 42 राहणार नाशिक, निवृत्ती महादेव डोंगरे वय 75, नींदुबाई निवृत्ती डोंगरे दोन्ही राहणार येवला, शरद एकनाथ राजगुरू वय 44 राहणार औरंगाबाद, धोंडाबाई गायकवाड वर 75 वर्षे राहणार येवला, जगन सिंग झाला, वय 52 राहणार नाशिक, राहुल उदय परदेशी, विद्या राहुल परदेशी वय 26 दोन्ही राहणार कळंब, उस्मानाबाद, अशोक अहिरे व 58 वर्षे राहणार नाशिक